बेळगाव लाईव्ह विशेष : कोणत्याही वॉर्डात विकास कामाची सुरुवात करताना त्या भागातील स्थानिक नगरसेवकांना घेऊन विकास करायला हवा मात्र बेळगाव मनपात सध्या समितीच्या नगरसेवकांना डावलून विकास कामांचे उद्घाटन केले जात आहे.
महापालिकेतील अधिकारी महापौर उपमहापौरांनी ज्या वार्डात काम सुरू आहे त्या वार्डातील स्थानिक नगरसेवकांला विकास कामांच्या भूमिपूजनाला बोलावणे गरजेचे होते मात्र समिती नगरसेवकांना डावलल्याने मराठी जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे. समितीचे नगरसेवक देखील लोकनियुक्त आहेत त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी आणि मनपाच्या अधिकाऱ्यांना समिती नगरसेवकांची इतकी एलर्जी का असा सवाल उपस्थित झाला आहे.
शुक्रवारी जुन्या कपिलेश्वर तलावात दूषित पाणी जाऊ नये, यासाठी भिंत उभारण्याच्या कामाचे उद्घाटन करताना महापौर शोभा सोमनाचे, उप महापौर रेश्मा पाटील, महापालिका आयुक्त अशोक दूडदुंटी सह दक्षिण भागातील भाजपचे बहुतांश नगरसेवक मनपाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेच्या फंडातून तलावात भिंत उभारण्यासह गणेश मूर्ती ठेवण्यासाठी कठडा उभारण्यात येणार आहे. पण, या कार्यक्रमातून भातकांडे यांना वगळण्यात आले. महापालिकेतर्फे कोणत्याही प्रभागात विकास कामे हाती घेताना त्या भागातील स्थानिक नगरसेवकाला माहिती देणे गरजेचे असते. परंतु त्यांना निमंत्रण न देता भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे याबाबतची माहिती लोकांनी नगरसेविका भातकांडे यांना दिली, त्यानंतर नगरसेविका वैशाली भातकांडे व सिद्धार्थ भातकांडे यांनी महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना माहिती का दिली नाही असा प्रश्न उपस्थित करीत जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोप केला.
त्यामुळे काही वेळ महापालिका अधिकारी व भातकांडे यांच्यात वाद निर्माण झाला. अधिकार्यांनी आपण दुसर्याकडून आपणाला कळवले होते, असे सांगून हात वर केले. पण, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समितीच्या नगरसेवकांना डावलण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे लोकांत संताप व्यक्त होत आहे.
विकास कामांच्या उद्घाटनातून म. ए. समितीच्या नगरसेवकांना वगळण्याचा वारंवार प्रयत्न होत आहे असा आरोप होत असताना शुक्रवारी पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली.कपिलेश्वर तलावाजवळ आला. या प्रभागाच्या नगरसेविका भातकांडे यांना वगळून विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे त्यांनी अधिकारी आणि महापौरांना चांगलाच जाब विचारला.
यावेळी नगरसेवक राजू भातकांडे, गिरीश धोंगडी, संतोष पेडणेकर, वाणी जोशी, मंगेश पवार, अभियंता लक्ष्मी निपाणीकर, सुरेश मुर्तेन्नावर यांच्यासह इतर उपस्थित होते.
कोणत्याही विधानसभा मतदारसंघात स्थानिक आमदारांना जर विकास कामांच्या उद्घाटन समारंभात विशेष महत्त्व दिले गेले नाही तर आमदार हक्क भंग दाखल करतात हे आपण पाहिलं आहे आता बेळगावच्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी त्यांना वारंवार विकास कामे उद्घाटन कार्यक्रमात डावलले जात आहे मग त्यांनी मनपा अधिकारी आणि महापौर उपमहापौर यांच्या बाबतीत काय करावे हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.