Friday, January 3, 2025

/

गुटखा जाहिराती विरुद्ध महामंडळाने उचलले पाऊल

 belgaum

बेळगाव लाईव्ह :श्री गणेशोत्सवाच्या मंगलमय काळात विधायक संदेश देण्याऐवजी गुटख्याची जाहिरातबाजी करणाऱ्या शहरातील कांही गणेशोत्सव मंडळांना मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेश उत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज समज देऊन गुटख्याचे फलक हटवण्याची सूचना केली आणि संबंधित मंडळांनी दखील ती सूचना मान्य केली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, कार्यकारी सचिव  आनंद आपटेकर आदींनी आज बुधवारी सकाळी शहरातील बसवान गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाला भेट देऊन त्यांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून घेतले. तसेच त्यांच्याकडे मंडपाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विमल गुटखा जाहिरातीच्या मोठ्या होर्डिंगबद्दल विचारणा केली.

काल श्री गणेश चतुर्थी दिवशीच सदर प्रकार आमच्या निदर्शनास आला होता पण गणरायाचे आगमन होणार असल्यामुळे आम्ही काल तुम्हाला विचारणा केली नाही असे सांगून महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ते होर्डिंग हटविण्यास सांगितले. त्याचप्रमाणे मंडप परिसरात लावलेले विमल गुटख्याचे लहान उभे -आडवे जाहिरात फलक स्वतःहून काढून टाकले.

Gutkha
Gutkha

गुटखा, गांजा वगैरे अंमली पदार्थांवर सरकारची बंदी आहे असे असताना प्रायोजक आहेत म्हणून अशा पद्धतीने गुटख्याची जाहिरातबाजी करणे गैर आहे. शाळा -महाविद्यालय, धार्मिक स्थळांच्या शेजारी त्यांची जाहिरात बाजी अथवा विक्री करता येत नाही. श्री गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला युवा पिढीला व्यसनाधीन करायचे नाही तर देशाचे चांगले सुदृढ जबाबदार नागरिक घडवायचे आहेत.11 yuvraj

तेंव्हा तुम्ही व्यसनाधीन गोष्टी सोडून इतर कोणत्याही उत्पादनांची जाहिरात करा, असे महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बसवान गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना समजावून सांगितले. त्यांचे म्हणणे पटल्यामुळे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गुटख्याचे संबंधित मोठे होर्डिंग हटवण्याचे आश्वासन दिले.11 kiran jadhav

तथापि महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खडेबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांना सदर प्रकाराची माहिती दिली. तसेच बसवान गल्ली मंडळाने आज सायंकाळपर्यंत स्वतःहून गुटख्याचे मोठे होर्डिंग न हटविल्यास पोलिसांनी रात्री ते हटवावे अशी विनंती केली. पोलीस अधिकारी निंबाळकर यांनी ती विनंती मान्य केली.

खडेबाजार येथील नामदेव दैवकी विठ्ठल मंदिरानजीकचा सार्वजनिक श्री गणेश मंडप आणि लोकमान्य रंगमंदिरा जवळील कोनवाळ गल्लीतील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाच्या ठिकाणी देखील विमल गुटख्याच्या मोठ्या होर्डिंगसह जाहिरातीचे फलक लावण्यात आले असल्यामुळे श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्या मंडपांनाही भेटी देऊन तेथील पदाधिकाऱ्यांना वरीलप्रमाणे समजावून सांगितले.11 Bharat

तसेच गुटख्याचे होर्डिंग व जाहिरात फलक फलक त्वरित हटवण्याची सूचना केली. उभय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना देखील सूचना पटल्यामुळे त्यांनी ते होर्डिंग व फलक हटविण्याचे मान्य केले आहे.11 Rohit

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.