Sunday, September 15, 2024

/

सर्वत्र गणेशमय वातावरण! कसा आहे उत्साह

 belgaum

बेळगाव लाईव्ह :गेल्या चार दिवसांपासून बेळगावात सुरू असलेल्या गणेश मय वातावरणाने मंगळवारी परमोच्य बिंदू गाठला असून गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आता आगामी दहा दिवस तेच वातावरण तोच जल्लोष आणि उत्साह बेळगाव शहर परिसरात असणार आहे.

आजपर्यंत दरवर्षी बेळगाव शहरातील श्री गणेशोत्सवाची शेवटच्या दिवशी होणारी श्री विसर्जन मिरवणूक लक्षवेधी ठरत होती. मात्र यंदा हा ट्रेंड बदलला असून सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाच्या आगमन सोहळ्याला देखील तितकेच महत्व दिले आहे.

त्यामुळे शहरामध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात होणारे श्रीमूर्तींचे आगमन व स्वागताचे भव्य जल्लोषी सोहळे लक्षवेधी ठरत आहेत.11 shivaji

दरवर्षी अनंत चतुर्दशी दिवशीच्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीस होणारा विलंब आणि त्यामुळे गणेश भक्तांचा होणार विरस लक्षात घेऊन यंदा शहरातील बहुतांश सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुकी इतकेच महत्त्व श्री गणेशाच्या स्वागताला दिल्याचे पहावयास मिळत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरातील सार्वजनिक श्री गणेश मूर्तींच्या आगमनाचे सोहळे साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.11 vaishali

श्री विसर्जन मिरवणूक ज्या अपूर्व उत्साह आणि जल्लोषात पार पडते, त्याच पद्धतीने यंदा झांज पथक, ढोल पथक, ध्वज पथक व भजनी मंडळांच्या समावेशासह फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीत श्री गणरायाचे स्वागतही भव्य प्रमाणात केले जात आहे. एकंदर मुंबईमध्ये ज्या पद्धतीने बाप्पाचे भव्य स्वागत केले जाते, तीच पद्धत आता बेळगावमध्येही रूढ होऊ लागली आहे.11 jamboti

विसर्जनाप्रमाणेच बापाचे स्वागतही भव्य प्रमाणात करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दरवर्षी श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला होणारा उशीर आणि मिरवणूक पाहण्यासाठी होणारी प्रचंड गर्दी हे होय. या दोन गोष्टींमुळे आपल्या हक्काच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रीमूर्ती समोर आनंदोत्सव साजरा करण्यापासून संबंधित गल्ली व परिसरातील स्थानिक लोकांना वंचित राहावे लागत होते. मात्र आता श्री गणेशाचे आगमन स्वागत सोहळाही भव्य प्रमाणात होत असल्यामुळे स्थानिक अबालवृद्ध, युवक विशेष करून महिलावर्ग नटूनथटून प्रचंड संख्येने या सोहळ्याचा आनंद लुटताना दिसत आहेत.11 yuvraj

विशेष करून शहरातील खडक गल्ली, चव्हाट गल्ली, कामत गल्ली, राजहंस गल्ली अनगोळ, महाद्वार रोड आदी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांच्या श्री गणेश मूर्तींचे आगमन सोहळे अपूर्व उत्साहासह मोठ्या जल्लोषात दिमाखाने पार पडले. सोशल मीडियासह सार्वजनिक ठिकाणी फलक व बॅनर उभारून या सोहळ्यांची मोठ्या प्रमाणात जाहिरात बाजी देखील करण्यात आली होती.11 Bharat

त्यामुळे लक्षवेधी ठरलेल्या या आगमन सोहळ्यांमध्ये स्त्री-पुरुष गणेश भक्त आणि बालगोपाळांचा प्रचंड सहभाग पहावयास मिळाला. राजहंस गल्ली अनगोळ येथील श्री गणेशाच्या स्वागत सोहळ्याला तर रस्त्यावर मुंगीलाही वाट मिळणार नाही इतकी खचाखच गर्दी झाली होती.Bgm wel come ganesh

हीच परिस्थिती खडक गल्ली येथील खडक गल्ली राजाच्या आगमन सोहळ्याप्रसंगी निर्माण झाली होती. खडक गल्ली आणि परिसरातील गणेश भक्तांनी रस्त्यावर तोबा गर्दी केल्यामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.11 rm

फटाक्यांची जोरदार आदषबाजी, ढोल-ताशा, हलगी पथकाबरोबरच ‘केरळा बँड’ हे खडक गल्ली राजाच्या आगमन सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य होते. खडक गल्लीच्या राजाचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने बेळगावचा मानाचा राजा असलेल्या खडक गल्लीच्या राजाची भव्यदिव्य प्रभावळ तयार करण्यात आली आहे.

या प्रभावळीचे उद्घाटन आज मंगळवारी सायंकाळी मंडपाच्या ठिकाणी 6 वाजता होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री क्षेत्र आप्पाचीवाडी व परमपूज्य श्री बाळूमामा यांचे मूळ क्षेत्र मेतके येथील भाकणूक कथानककार श्री भगवान डोणे महाराज वाघापूरकर उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या खडक गल्ली राजाचे मूर्तिकार जे. जे. पाटील हे असून प्रभावळ मूर्तिकार चेतन कुंभार आहेत. त्याचप्रमाणे संकल्पना ओमकार मनमाडकर यांची आहे.11 Rohit

यंदा आणखी एक नवा ट्रेंड आलाय तो म्हणजे यावेळी बहुतांश सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांनी विद्युत रोषणाईसह मंडपाचा दर्शनीय भाग भव्य करण्याऐवजी कपड्याचा वापर करून मंडपाची आकर्षक सजावट करताना आपल्या गणरायाची मूर्ती उंच भव्य असेल यावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.11 maratha bank

शहरातील विविध ठिकाणच्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडपामध्ये आज मंगळवारी श्री गणेश चतुर्थी निमित्त 12 फूट, 15 फूट, 20 फूट, 22 फूट इतक्या उंचीच्या भव्य श्री मूर्तींची प्रतिष्ठापना केली जात आहे. एकंदर यावर्षी श्री गणरायाच्या आगमन सोहळ्यांची संख्या वाढली असून लक्षवेधी असे हे सोहळे भव्यदिव्य ऐतिहासिक होत आहेत.11 kiran jadhav

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.