बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील विविध गाळ्यांच्या लिलावासाठी महापालिकेने आयोजित केलेला लिलाव न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे रद्द करण्यात आला.
महापालिकेने गुरुवारी सात गाळ्यांसाठी लिलाव आयोजित केला होता. पण, लिलाव सुरू होण्याआधी चव्हाट गल्ली, किर्लोस्कर रोड आणि माळमारूती येथील गाळ्यांच्या लिलावास स्थगिती असल्याचा आदेश दुकानदारांनी महापालिका अधिकार्यांकडे दिला.
स्थगिती आदेश असल्यामुळे ही प्रक्रिया राबवण्यात येऊ नये, असे त्यांनी सांगितले. या आदेशावर अधिकार्यांनी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी ज्या गाळ्यांच्या लिलावावर स्थगिती आदेश आहे, ते वगळून इतर गाळ्यांच्या लिलावास परवानगी देण्यात आली
.पण इतर इच्छुकांनीही लिलावातून काढता पाय घेतला. त्यामुळे महापालिकेवर लिलाव प्रक्रिया रद्द करण्याची नामुष्की ओढवली. महापालिका एकूण 208 गाळ्यांचा लिलाव करणार आहे.