बेळगाव लाईव्ह :पेट्रोल पंपाच्या आवारातच कारला आग लागली मात्र पंप कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सजगतेमुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असल्याची घटना बेळगाव शहरातील नेहरू नगर भागातील रामदेव हॉटेल जवळ घडली आहे.
मंगळवारी दुपारी नेहरू नगरच्या बी बी होसमनी यांच्या मालकीच्या असलेल्या पेट्रोल पंपावरील आवारात अचानक कारने पेट घेतला मात्र पेट्रोल पंपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला आहे.
गाडीत डिझेल घालण्यासाठी पेट्रोल पंपावर पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी आली होती त्या गाडीच्या बोनेट मध्ये आगीने पेट घेतला त्यावेळी गाडीचा चालवणारा तिथं नव्हता मात्र पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यांनी अग्निशामक दलाच्या साहाय्याने मोठ्या शिताफीने कार गाडीला लागलेली आग विझवली.
कशा पद्धतीने मोठ्या शिताफीने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी अग्निशामक दलाच्या साहाय्याने आग विझवली त्याची दृश्य पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून सर्वत्र सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली आहेत त्यामुळे या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांचे साहसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एपीएमसी पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत सदर घटना घडली असून अग्निशमक दल आणि पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सज्जकता आणि कार्य तत्परतेमुळे हा मोठा अनर्थ टळला आहे.
https://x.com/belgaumlive/status/1701519305811341556?s=20