Tuesday, January 28, 2025

/

मनपा आयुक्तांनी कार्य तत्परता

 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील स्वच्छतेसाठी पहाटे राऊंड मारत स्वच्छता कर्मचाऱ्यांना वळणीवर आणणारे आपल्या कार्यतत्परतेची चुणूक दाखवणारे  बेळगाव महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगूंटी यांनी जनतेच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी देखील पुढाकार घेण्याचा सपाटा लावला आहे.

बेळगाव महापालिका आयुक्त सध्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या समस्या, अडचणी सोडविण्यास तत्पर झाल्याचे पहावयास मिळत आहे. युद्धपातळीवर साफ करण्यात आलेले भगतसिंग चौक, पाटील गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडपाच्या ठिकाणचे तुंबलेले गटार हे त्याचे उदाहरण म्हणावे लागेल. याच पद्धतीने आता शहरातील सर्व मंडप परिसर स्वच्छतेचे काम महापालिकेने हाती घेतले असून त्यामुळे कार्यकर्ते व गणेश भक्त समाधान व्यक्त होत आहे.

शहरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांच्या हितासाठी तत्पर असलेल्या मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी व इतर पदाधिकारी घेत असलेल्या परिश्रमामुळे विविध समस्या, अडथळे दूर होऊ लागले आहेत. श्री शनी मंदिराजवळील भगतसिंग चौक, पाटील गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाच्या ठिकाणी गेल्या सोमवारी गटार तुंबून सांडपाणी रस्त्यावर आले होते.Corporation

 belgaum

संबंधित गटारीची वेळच्यावेळी सफाई केली जात नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात तुंबलेल्या या गटारीचे सांडपाणी थेट मंडपात शिरले होते. याबाबतची माहिती मिळताच गणेश महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी व अन्य पदाधिकाऱ्यांनी रात्री तात्काळ भगतसिंग चौक येथे जाऊन तुंबलेल्या गटारीची समस्या जाणून घेतली.

त्यानंतर कलघटगी यानी लागलीच सदर समस्येची माहिती महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी आणि वरिष्ठ अधिकारी मुख्य अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर यांना दिली दिली. तेंव्हा मनपा आयुक्तांनी संबंधित तुंबलेली गटार तात्काळ स्वच्छ करण्याचा आदेश दिला. त्यानुसार गटार साफ करून मंडप परिसर स्वच्छ करण्यात आल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.11 Bharat

दरम्यान पावसाळा अद्याप संपलेला नाही. त्यामुळे गणेशोत्सव काळात जोरदार पाऊस झाल्यास उपरोक्त समस्या शहरातील अन्य मंडपांच्या ठिकाणी उद्भवू शकते. सध्या शहरातील बऱ्याच सार्वजनिक श्री गणेश मंडपाच्या परिसरात स्वच्छता साफसफाईची गरज आहे. वेळच्यावेळी सफाईचे काम होत नसल्यामुळे काही मंडप परिसरातील गटारी व ड्रेनेज तुंबलेल्या आहेत. ही बाब गणेश महामंडळाचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी यांनी महापालिका आयुक्त दूडगुंटी यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडप परिसर चुना टाकून स्वच्छ ठेवण्याचे तसेच तेथील गटारी, ड्रेनेजची साफसफाई करण्याचे आदेश आरोग्य खात्याला दिले आहेत. त्यानुसार श्री शनी मंदिर भिंतीला लागून असलेला कचऱ्याचा ब्लॅक स्पॉट हटविण्यात आला आहे.11 shivaji

तो ब्लॅक स्पॉट हटवून त्या जागेची स्वच्छता करण्याद्वारे चुना टाकून महापालिकेने त्या ठिकाणी रंगरंगोटीसह ‘कचरा टाकू नये’ हा फलक देखील उभारला आहे. मनपा आयुक्तांच्या आदेशावरून याच पद्धतीने मनपा आरोग्य खात्याने गटारीच्या सफाईसह घाण व कचऱ्याचे उच्चाटन करून शहरातील सर्व सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडप परिसर स्वच्छ आणि प्रसन्न करण्याची मोहीम हाती घेतल्यामुळे मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.

*शहरातील सार्व. श्री गणेश मंडप परिसर स्वच्छ ठेवण्याची मागणी*

शहरातील सार्व. श्री गणेश मंडप परिसर स्वच्छ ठेवण्याची मागणी

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.