बेळगाव लाईव्ह: पाठी मागून दगडाने ठेचून युवकाचा खून केल्याची घटना बुधवारी रात्री बेळगाव शहरातील शिवबसव नगर येथील स्पंदन हॉस्पिटल जवळ घडली आहे.
नागराज गाडी वड्डर वय30 रा. गँग वाडी बेळगाव असे या घटनेत मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.
घटनस्थळा वरून मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी टोळीनं युवकाचा पाठलाग केला आणि दगडाने ठेचून त्याचा खून करत फरारी झाले.घटनास्थळी माळ मारुती पोलिसांनी धाव घेतली असून त्या परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खून होताच माळ मारुती पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिसरात नाकाबंदी केली असून चौकशी सुरु केली होती. नेमके खून होण्याचे कारण काय याचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
हल्लेखोर कोण होते मयत युवकाचे त्याचे काय संबंध होते त्याचा खून का केला हे पोलीस तपासात स्पष्ट होणार आहे.