Sunday, September 1, 2024

/

गणेश उत्सवा आधी अनगोळचे हे काम करा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनगोळ येथील मूर्तिकार तसेच गणेश भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी संत मीरा स्कूल रोड आणि रघुनाथ पेठ रोड अनगोळ हे रस्ते श्री गणेशोत्सवापूर्वी रहदारीसाठी अनुकूल करावेत, अशी मागणी समस्त गणेश भक्तांच्यावतीने माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर यांनी महापौर आणि मनपा आयुक्तांकडे केली आहे.

अनगोळचे माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन नुकतेच महापौर शोभा सोमनाचे आणि महापालिका आयुक्त अशोक दूडगुंटी यांना सादर केले. या उभयतांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. अनगोळ येथील संत मीरा स्कूल रोड या रस्त्याची संपूर्णपणे वाताहत झाली असून प्रशासनाने सदर रस्त्याच्या विकासाचे काम हाती घेतले आहे

. मात्र गेल्या 6 महिन्यांपासून हे काम अतिशय संथ गतीने होत असून ते म्हणावे तसे दर्जेदारही नाही. सध्या या रस्त्यावर मातीचे ढिगारे पडलेले असून ग्रामीण भागातील अविकसित रस्त्याप्रमाणे या रस्त्याची अवस्था झालेली आहे. हा एकमेव रस्ता आहे की ज्याद्वारे अनगोळ येथील प्रसिद्ध मूर्तिकारांकडून गणेश भक्त आणि सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळे आपल्या श्रीमूर्ती अनगोळातून बाहेर आपापल्या ठिकाणी नेत असतात. आता गणेशोत्सव जवळ आला (19 सप्टेंबर रोजी) आहे.Angol memo

म्हणजे त्याला जवळपास 20 दिवस बाकी आहेत. बेळगावातील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणेशोत्सवा दिवशी किंवा आदल्या दिवशी अनगोळ येथील मूर्तिकारांकडून आपापल्या श्री गणेश मूर्ती घेऊन जात असले तरी परगावची म्हणजे हुबळी, धारवाड आणि दावणगिरी येथील श्री गणेश मंडळे 8-10 दिवस आधीच आपल्या श्रीमूर्ती अनगोळ येथे येऊन घेऊन जात असतात. त्यामुळे आपल्याला नम्र विनंती आहे की आपण जातीने लक्ष घालून सदर संत मीरा रस्त्याचे विकास काम येत्या 10 सप्टेंबर 2023 पूर्वी पूर्ण करून तो रहदारीस अनुकूल करावा.

याखेरीज श्री गणेशोत्सव काळात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी रघुनाथ पेठ येथील रस्त्याचे हाती घेण्यात आलेले विकास काम उत्सव संपेपर्यंत बंद ठेवण्याची सूचना केली जावी.

याव्यतिरिक्त हेस्कॉमला आवश्यक वीज पुरवठा करण्याची आणि वनखात्याला श्री गणेशाच्या मोठ्या उंच मूर्ती सुलभरीत्या घेऊन जाता याव्यात यासाठी रस्त्यावरील अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडण्याची सूचना करावी, अशा आशयाचा तपशील माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.