बेळगाव लाईव्ह :’बेळगाव महापालिकेचे महापौर आणि उपमहापौर महिला असण्याबरोबरच आता महापालिकेच्या तीनही उपायुक्त पदांवर तसेच अन्य कांही महत्त्वाच्या पदावर महिला अधिकारी कार्यरत असल्यामुळे महापालिकेच्या कामकाजाची धुरा महिलांकडे येऊन ‘महिलाराज’ निर्माण झाले आहे.
बेळगाव महापालिकेच्या महापौर शोभा सोमनाचे तर उपमहापौर रेश्मा पाटील या आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेच्या विकास उपायुक्त पदी अधीक्षक अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर आहेत. तसेच दोन वर्षांपूर्वी प्रशासन उपायुक्त पदी भाग्यश्री हुग्गी यांची नियुक्ती झाली आहे.
आता महसूल उपायुक्त पदी रेश्मा तालिकोटी यांची नियुक्ती झाली असून त्यांनी गेल्या गुरुवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यानंतर महापालिकेत तीन उपायुक्त पदे महत्वाचे आहेत.
ही तीनही महत्त्वाची पदे महिलांकडे आहेत. याखेरीज महापालिकेचे महत्त्वाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता हे पद मंजुश्री तर सहाय्यक नगररचना अधिकारी पद श्वेता शिवपुजीमठ या सांभाळत आहेत.
याव्यतिरिक्त स्थायी समिती निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपने महिलांना संधी देताना चार पैकी तीन स्थायी समितीचे अध्यक्षपद महिलांकडे सोपवले आहे. एकंदर या पद्धतीने महापालिकेतील कामकाजाची धुरा सध्या महिलांकडे येऊन महिला राज सुरू झाले आहे.
पुरुष प्रधान समाजात बेळगाव महापालिकेत इतक्या मोठ्या प्रमाणात महिला राज आल्यानं मनपा महिला सत्ताक बनली आहे.महापौर उपमहापौर चार पैकी तीन स्थायी समिती महिलांकडे या शिवाय तीन उपायुक्त महिला अशी पदे महिलांकडे आहेत.