Tuesday, May 14, 2024

/

जीवदानाबद्दल अपघातग्रस्त युवकाने मानले ‘यांचे’ आभार

 belgaum

पिरनवाडी येथील सोमनाथ पेट्रोल पंपसमोर गेल्या 15 दिवसांपूर्वी अपघातात गंभीर जखमी झालेल्या निरंजन माने या युवकाची प्रकृती आता सुधारत असून त्याने आपला जीव वाचविल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे यांचे शतशः आभार मानले आहेत.

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पिरनवाडी येथील सोमनाथ पेट्रोल पंपासमोर अपघात होऊन तिघेजण जखमी झाले होते. त्यामध्ये निरंजन माने हा डोक्याला गंभीर इजा झालेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडला होता.

योगायोगाने त्याच वेळी माजी महापौर विजय मोरे आणि त्यांची पत्नी मारिया मोरे शांताई वृद्धाश्रमाकडे जात होते. त्यांनी प्रसंगावधान राखून जखमी निरंजनला उपचारासाठी तातडीने वेणूग्राम हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले. त्यावेळी चौकशीअंती त्यांना निरंजनचे नाव आणि तो अशोक आयर्न कंपनीत काम करत असल्याचे समजले.

 belgaum

पुढे निरंजनला अधिक उपचारासाठी विजया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जेथे डॉक्टरांना त्याचा जीव वाचविण्यात यश आले. त्याबद्दल निरंजन माने याच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलाला जीवदान देणाऱ्या माजी महापौर विजय मोरे आणि संबंधित इतरांचे आभार मानले होते.More

त्यानंतर विजय मोरे आणि त्यांचे चिरंजीव सामाजिक कार्यकर्ते ॲलन मोरे यांनी विजया हॉस्पिटलमध्ये जाऊन नुकतीच निरंजन माने याची भेट घेतली आणि विचारपूस केली. तसेच आणखी काही मदत लागल्यास ती करण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी निरंजन याने आपला जीव वाचवल्याबद्दल माजी महापौर विजय मोरे यांना शतशः धन्यवाद देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी बोलताना प्रत्येकाचा जीव बहुमूल्य असतो. तेंव्हा सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर कोणी शारीरिक व्याधीग्रस्त अथवा अपघातग्रस्त असहाय्य व्यक्ती आढळल्यास सर्वप्रथम नागरिकांनी त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल करावे, असे आवाहन विजय मोरे यांनी केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.