विद्यार्थी मैदानात खेळतेवेळी त्यांना सापडलेल्या जखमी अवस्थेतील सशाला जीवदान देण्याचे काम पिरनवाडी येथील के एल एस पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी केले आहे.
पिरनवाडी शेजारील जंगलातून चुकून मानवस्तीत कडे आलेल्या एका सशाला कुत्र्यांनी जखमी केले होते, तो ससा जखमी अवस्थेत मैदानात खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना दिसला त्यावेळी विद्यार्थ्यांनी लागलीच सशाची माहिती कर्मचाऱ्यांना दिली.
के एल एस शाळेच्या कर्मचाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांना पाचारण केलं, संतोष दरेकर यांनी जखमी सशावर प्राथमिक उपचार करत सदर सशाला वन विभागाकडे सुपूर्त केले.
मागील काही दिवसापूर्वी सेंट जोसेफ शाळेच्या एका विद्यार्थिनींने जखमी कावळ्याला जीवदान दिले होते, ती घटना ताजी असताना आता केल्याच्या विद्यार्थ्यांनी कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या या सशाला जीवनदान दिले आहे.
विद्यार्थी हळूहळू प्राणी प्रेमी बनत आहेत पक्षी प्रेमी बनत आहेत हेच अधोरेखित होत आहे.