बेळगाव लाईव्ह: खानापूर तालुक्यातील लक्केबैल, लोकोळी व जैनकोप परिसरात डोंगरी भागात बिबट्याचा वावर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तिन्ही गावच्या बाजूला एक डोंगर पठार आहे.
या पठारात 31 जुलै रोजी एक बिबट्या काही लोकांच्या निदर्शनास आला होता. त्यानंतर एक ऑगस्ट रोजी परिसरात पाच कुत्र्यांचा फरशा पडल्याचे दिसून आल्याने गावकऱ्यात दहशतीचे वातावरण आहे.
शेतवडीकडे जाणाऱ्या महिला वर्गातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी वन खात्याने या परिसरात सापळा रचून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी लक्केबैल ग्रामस्थांनी केली आहे.
त्यानुसार वन खात्याने बिबट्याचा बंदोबस करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सतर्कता म्हणून ग्रामस्थांसाठी गावात जाऊन दवंडी पिटण्यात आली आहे.सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.
संग्रहीत छाया