शिवबसवनगर येथील श्री ज्योतिबा देवालय येथे श्रावण मासानिमित्त येत्या रविवार दि. 27 ऑगस्ट ते रविवार दि. 3 सप्टेंबर 2023 या कालावधीत दररोज सायंकाळी 5:30 ते 7 वाजेपर्यंत ‘श्री केदारविजय’ ग्रंथ निरूपण कार्यक्रम अर्थात पारायण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
श्री ज्योतिबा देवस्थानाचे पुजारी लक्ष्मण पुणे व मयुरेश गोडसे हे ‘केदारविजय’ ग्रंथाचे प्रवचन /कथन करणार आहेत.
प्रत्येक दिवशी कथेचे विषय वेगवेगळे असणार असून ते पुढील प्रमाणे असतील. रविवारी 27 ऑगस्ट रोजी : श्री केदारनाथ प्रकट होण्याचे कारण काय? नाथांना रवळनाथ का संबोधतात? भैरव सैन्याचे वर्णन. सोमवारी 28 रोजी : शिवरात्री कथन, दक्षिण मोहिमेची सुरुवात, गोकठी कथा येमाई प्रकटीकरण. मंगळवारी 29 रोजी : चोपडाई देवी, जेजुरी खंडोबा, येमाई (रेणुका) यांची सविस्तर माहिती.
बुधवारी 30 रोजी : श्रावण षष्ठीचे महत्व, रत्नासुर रक्तभोज वध, अष्टगंध देवास का प्रिय आहे?. गुरुवारी 31 रोजी : महालक्ष्मी, केदारनाथ राज्याभिषेक, एकादशी कथन, केदारनाथांनी रत्नागिरी भोवती स्थापन केलेली अष्टतीर्थ, 12 ज्योतिर्लिंग कथन. शुक्रवारी 1 सप्टेंबर रोजी : गंगा अवतरण कथा, गजेंद्रोध्दार, नाथांचे परभक्त गोमा सावंत, नावजी आणि नाथभुजंग महाराज यांच्या कथा, नवरात्रीचे महत्त्व. शनिवारी 2 रोजी : सप्ताहातील प्रमुख विषय विशेष अध्याय केदारनाथांचा जन्म की अजन्म? केदारनाथ कसे प्रकट झाले? सासनकाठीचे महत्त्व. चैत्र यात्रेची सविस्तर माहिती आणि महत्त्व.
रविवार 3 सप्टेंबर रोजी : श्रीनाथ कीर्तनाने सप्ताहाची सांगता. तरी समस्त श्री नाथभक्तांनी या निरूपण कथेच्या प्रवचनाचा लाभ घेऊन एक वेगळा आध्यात्मिक अनुभव घ्यावा. या केदारविजय पारायण सप्ताहास येऊन आपल्या कुलदेवतेविषयी यथार्थ माहिती जाणून श्रवणाचे पुण्य प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन श्री जोतिबा देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.