अचानक उच्च दाबाचा वीजपुरवठा झाल्यामुळे घराघरांमधील टीव्ही, फ्रिज वगैरे विद्युत उपकरणं जळाल्याची घटना काल मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास शहापूर परिसरात घडली असून यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
हाय व्होल्टेजमुळे अर्थात अतिउच्च दाबाचा वीज पुरवठा झाल्यामुळे शहापूर बसवान गल्ली व सराफ गल्लीच्या मागील भागातील परिसर तसेच गाडे मार्ग येथील घराघरांमध्ये असलेली टीव्ही फ्रिज यासारखी उपकरणं जळाली आहेत.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सदर परिसरात खळबळ उडाली असून झालेल्या नुकसानी जबाबदार कोण? असा संतप्त सवाल केला जात आहे. जनतेचे नुकसान करणाऱ्या हाय व्होल्टेजच्या या प्रकारामुळे हेस्कॉमचा बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शहापूर बसवान गल्ली व सराफ गल्लीच्या मागील भाग तसेच गाडी मार्ग येथे विजेच्या उच्च दाबामुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यामध्ये गजानन पेडणेकर, लक्ष्मी पेडणेकर, शोभा बांदिवडेकर, माया कुंद्री आदींसह बहुसंख्य नागरिकांचा समावेश आहे.
बेळगाव शहर परिसरात अनेक ठिकाणी विजेच्या तारा धोकादायक अवस्थेत खालील कळत आहे मात्र त्याकडे इस्कॉनचे दुर्लक्ष होत आहे अलीकडेच बिजगरणी येथे विद्युत भारी तार अंगावर तुटून पडल्यामुळे शेतकरी दांपत्य जागीच ठार झाले होते. आता अतिउच्च दाबामुळे घरातील उपकरणे निकामी होत आहेत.
याची गांभीर्याने दखल घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा पालक मंत्री आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जनतेच्या सुरक्षतेच्या दृष्टीने हेस्कॉमच्या बेजबाबदार कारभाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच शहापूर बसवान गल्ली व सराफ गल्लीच्या मागील भाग तसेच गाडी मार्ग येथील नुकसानग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी जोरदार मागणी केली जात आहे.