Sunday, April 21, 2024

/

वायव्य परिवहन मंडळाकडून एक दिवसीय टूर पॅकेज

 belgaum

बेळगाव लाईव्ह: सध्या पावसाळी हंगामामुळे वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाने शनिवार व रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी लोकांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या एकदिवसीय विशेष बसेसला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही यंत्रणा इतर ठिकाणी वाढविण्याची मागणी लक्षात घेऊन बेळगावहून एक दिवसीय टूर पॅकेज विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

शक्ती योजनेंतर्गत या विशेष बसेस महिलांना मोफत प्रवास उपलब्ध असणार नाही.या विशेष बसेस दर रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उपलब्ध आहेत असेही कळविण्यात आले आहे.

बेळगाव पासून 9 ऑगस्ट 2023  पासून वायव्य परिवहन मंडळा कडून  बेळगाव पासून मंदिरे आणि धबधब्यांसह विविध प्रेक्षणीय स्थळांपर्यंत अनेक नाविन्यपूर्ण एकदिवसीय पॅकेज ट्रिप आयोजन केल्या आहेत.

बेळगावमधून एकूण नऊ वेगवेगळ्या पॅकेजेस उपलब्ध आहेत. नमूद केलेल्या भाड्यात नाश्ता/प्रवेश शुल्क वगळून फक्त फेरीचे भाडे समाविष्ट आहे

बेळगाव येथील वायव्य परीवाहन मंडळाने वन डे टूर पॅकेजचे तपशील

पॅकेज 1 – बेळगाव-हिडकल धरण-गोडाचिनमलकी फॉल्स-गोकाक फॉल्स
संपर्क: 7760991625/27: 7618765904 भाडे: प्रौढ: 190 मुले: 100 वेळ: प्रस्थान: सकाळी 9 आगमन : संध्याकाळी ६

पॅकेज – बेळगाव-नगरतास फॉल्स-आंबोली फॉल्स संपर्क: 7760991625/7618765904 भाडे: प्रौढ: 290 मुले: 150 वेळ: प्रस्थान: सकाळी 9 आगमन : संध्याकाळी ६

पॅकेज – बेळगाव-श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर-श्री क्षेत्र कान्हेरी मठ – (मल्टी एक्सल व्हॉल्वो) संपर्क: 7760991625/9110827854 भाडे: प्रौढ: 600 मुले: 450 वेळ: प्रस्थान: सकाळी 8 आगमन: संध्याकाळी 7.30

पॅकेज – (बेळगाव सिटी टूर) – बेळगाव-राजहंसगड-मिलिटरी श्री महादेव मंदिर-K.R.S. प्राणीसंग्रहालय- श्री रेवण सिद्धेश्वर मंदिर हुंचेवरी मठ, अलौकिक ध्यान मंदिर निलजी – मेघदूत बस संपर्क: 7760991626/7619564561 भाडे: प्रौढ: 150 मुले: 80 वेळ: प्रस्थान: 8.45 AM आगमन : संध्याकाळी ५.४५

पॅकेज – बेळगाव-गंगाजका इक्यस्थल/श्री अस्वथ लक्ष्मीनरसिंह स्वामी मंदिर (एमके हुबल्ली)- कित्तूर किल्ला-श्री सोमेश्वर मंदिर सोगला नवलतीर्थ धरण (मुनावल्ली) संपर्क: 7760991627/9986099961 भाडे: प्रौढ: 350 मुले: 180 वेळ: प्रस्थान: 7.45 AM आगमन : संध्याकाळी ७.१५

पॅकेज – बेळगाव- राजहंसगड- विश्रांती आश्रम बेळगुंदी- राकसकोप्प धरण- धामणे फॉल्स/नेचरा कॅम्प श्रीवैजनाथ मंदिर महिपालगड संपर्क: 7618765904/8073596369 भाडे: प्रौढ: 200 मुले: 100 वेळ: प्रस्थान: 7.45 AM आगमन: संध्याकाळी 5.30Tour pkg nwkrtc

पॅकेज – बैलहोंगल-श्री वीरभद्रेश्वर मंदिर गोदाची-मेना बसदी बदामी लेणी-श्री बनशंकरी मंदिर-श्री शिवयोगी मंदिर संपर्क: 7760991628/9901106629 भाडे: प्रौढ: 270 मुले: 140 वेळ: प्रस्थान: सकाळी 8 आगमन : संध्याकाळी ५.१५

पॅकेज – बेळगाव-राजहंसगड-असोगा नदी किनारा-नंदगड संगोळळी रायण्णा समाधी-हलसी भुवरहा श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर-कक्केरी श्री बिष्टमा देवी मंदिर. संपर्क: 7760991631/9945566685 भाडे: प्रौढ: 230 मुले: 120 वेळ: प्रस्थान: 7.45 AM आगमन : संध्याकाळी ५.१५

पॅकेज – बेळगाव – कक्केरी- दांडेली क्रोकोडाइल पार्क- मौलांगी पार्क- कुलगी नेचर पार्क संपर्क: 7760991625/9110827854 भाडे: प्रौढ: 360 मूल: 180 वेळ: प्रस्थान: सकाळी 7.30 आगमन : संध्याकाळी ७.४५ तिकीट बुकिंग: www.ksrtc.in, www.nwkrtc.in :7760991635, 7760991613, 7760991612

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.