Monday, January 27, 2025

/

दुरूस्ती करताना विजेच्या स्पर्शाने खांबावर व्यक्तीचा मृत्यू : कुटुंबाचा आक्रोश

 belgaum

दुरुस्ती करताना विजेच्या स्पर्शाने खांबावर खासगी इलेक्ट्रिशियन मरण पावल्याची दुर्दैवी घटना चिकोडी शहरातील होसपेठ गल्लीत आज घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा चिकोडी निष्काळजीपणा उघडकीस आला आहे.

सिद्धराम कुपवाडे ( वय 38) रा. दफेदारकोडी चिकोडी असे मयत व्यक्तीचे नाव आहे.याबद्दल अधिक माहिती अशी की सिद्धराम याला मागील सहा महिन्यापासून हेस्कॉमचे कर्मचारी कामाला घेऊन जातात. सिद्धराम हा हेस्कॉमचा कर्मचारी नसला तरी हेस्कॉमचे कर्मचारी याच्याकडून खांबावर चढने, दुरुस्तीच्या कार्यासह सर्व कामे करून घेतली जातात.

वीज तारा लोंबकळत असल्याबाबतची शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून, आज घटनास्थळी हेस्कॉमचे कर्मचारी आपल्यासोबत सिद्धराम याला बोलावून घेऊन जातात. यावेळी हेस्कॉम कर्मचारी खाली थांबून सिद्धराम याला खांबावर चढवतात. यावेळी अचानक तारेत वीजेचा पुरवठा होऊन विजेच्या झटक्याने खांबावरच सिद्धराम यांचा मृत्यू झाला.सिद्धराम यांना, दोन लहान मुले असून इयत्ता सहावीत व नववीत शिकत असून पत्नी हृदयविकाराने त्रस्त आहेत.

 belgaum

खून केल्याचा घरच्यांचा आरोप:

घटनास्थळी घरातील लोक दाखल झाले. मृतदेह पाहून आक्रोश व्यक्त करून हंबरडा फोडला. हेस्कॉमचे कर्मचारी मागील सहा महिन्यांपासून कामाला घेऊन जात आहेत. आज सर्व कर्मचारी खाली उभे राहून सिद्धराम यांना खांबावर चढवले. तसेच सर्व लाइन बंद असल्याचे सांगतात. ही घटना कशी घडली असा सवाल करत, हेस्कॉम कर्मचार्यानी माझ्या मामाचा खून केल्याचा आरोप जावई बाळकृष्ण याने केला.

सकाळी कामाला जातो असे वडीलांचे शेवटचे बोलणे सांगुण मुलगा हणमंत डोळ्यातुन अश्रू काढला, तसेच मयताच्या कुटुंबाला आर्थिक भरपाई करण्याची मागणी कुटुंबाने केली आहे.

याविषयी हेस्कॉम सेक्शन अधिकारी राजू कुंभार बोलताना म्हणाले आज मरण पावलेला सिद्धराम कुपवाडे बा हेस्कॉम कंत्राटी कामागार नसून, तो खासगी व्यक्ती आहे. आमच्या खात्यातील लाईनमन ताहीर दफेदार यांनी त्याला बोलावून आणले होते. वायर सैल झाल्याने दुरुस्ती कार्य करीत होते. कोणत्या लायनला एलसी हवी याची विचारणा केली होतो.
केवळ चिकोडी ग्रामीण भागाची एलसी घेतले होते. पण शहर विभागाची एलसी घेण्यात आलेली नव्हती.
पण आज सर्व लाईन बंद असल्याचे समजून खांबावर चढून दुरूस्तीचे काम करताना विद्युतभरीत तारेमुळे विजेचा झटका लागून सिद्धराम यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे सांगितले.
तसेच आम्ही खासगी व्यक्तिंना विजेच्या खांबावर चढवू नका असे लाईनमन कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. तरी पण लाईनमन खासगी इलेक्ट्रिक काम करणाऱ्याना बोलावून घेऊन काम करीत होते. विजेच्या खांबावर चढून काम करण्याची जबाबदारी ही लाईनमनची असते. याविषयी वरीष्ठ अधिकार्यांना माहिती दिल्याचे सेक्शन अधिकारी कुंभार सांगितले.
हेस्कॉमचे सहायक कार्यकारी अभियंताचा फोन नॉट रीचेबल: हेस्कॉमचे चिकोडी सहायक कार्यकारी अभियंता नागराज येलकर हे लोकांना भेटत नाहीत , नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई केली जात नाही. तर भेटण्यास गेलेल्या लोकांशी सरळ बोलले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. आज इतकी मोठी घटना घडली असताना त्यांचा फोन नॉट रीचेबल येत होता. आशा अधिकाऱ्यामुळे आशा घटना घडत आहेत. अशा बेजबाबदार अधिकार्यावर कारवाई करण्याची मागणी नागरीक करीत आहेत. याकडे संबंधित लोकप्रतिनिधीनी लक्ष द्यावे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.