Wednesday, May 8, 2024

/

कुत्र्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय बालक जखमी

 belgaum

बेळगाव लाईव्ह: भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय बालक जखमी झाल्याची घटना आजम नगर येथे रविवारी सायंकाळी घडली आहे.

अर्कण रियाझ अत्तार वय 8 रा.आझम नगर बेळगाव या भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालकाचे नाव असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो शाळकरी विद्यार्थी आहे.

रविवारी सायंकाळी आझम नगर परिसरात अचानक भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला शरीरावर सहा ठिकाणी चावा घेतला या घटनेत सदर बालक जखमी झाला असून जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.

 belgaum

बेळगाव महापालिका कार्यक्षेत्रात पावसाळ्यात भटक्या कुत्र्याचा मुद्दा पुन्हा एरणीवर आला आहे त्यामुळे महापालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील या निमित्ताने वाढू लागली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.