बेळगाव लाईव्ह :बेळगाव आणि परिसरातील जेष्ठ नागरिकांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी संजीवीनी फौंडेशनच्या माध्यमातून त्यांना उत्साहित करण्यासाठी “उमंग २०२३” या नृत्य आणि गायनाच्या भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
वृद्धांना आधार या संकल्पनेतून नेहमीच वृद्धांना मदत करण्यासाठी तत्पर असणाऱ्या संजीवीनी फौंडेशनच्या वतीने अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात.
एक ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून जेष्ठ नागरिकांच्या अंगभूत वैविध्यपूर्ण कलागुणांना उत्तेजन देण्याच्या दृष्टीने गायन स्पर्धा, वैयक्तिक नृत्य आणि समूह नृत्य या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
बेळगावमध्ये जेष्ठ नागरिकांसाठी इतक्या मोठया प्रमाणात पहिल्यांदाच अशा स्पर्धा होत असून
रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे बक्षिसाचे स्वरूप असणार आहे.
प्रथम या स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात असणार असून त्यातील सर्वोत्तम पाच स्पर्धकांना एक ऑक्टोबर रोजी लोकमान्य रंगमंदिर येथील कार्यक्रमात आपली कला सादर करावी लागणार आहे त्यातून विजेता आणि उपविजेता ठरणार आहे.
३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत आपले गाणे अथवा नृत्य वॉट्सअप्पद्वारे पाठवायचे आहे.
व्हीडिओ हा साधारण दोन मिनिटांचा असावा. तसेच समूहनृत्य स्पर्धेत सहा ते आठ सदस्य असावेत.
या स्पर्धेत साठवर्षावरील कोणालाही सहभागी होता येणार आहे.
या स्पर्धेची सविस्तर माहिती,अर्ज, नियम व अटी साठी संजीवीनी फौंडेशन, आदर्श नगर वडगाव किंवा ९४४८१९१२६६ / ७३४९६७०१४६ या क्रमांकावर संपर्क साधावा
असे व्यवस्थापकीय संचालक मदन बामणे यांनी कळविले आहे.