बेळगाव लाईव्ह:हलक्या व्यावसायिक वाहनांवर (एलसीव्ही) आकारला जाणारा आजीवन कर कर्नाटक राज्य सरकारने मागे घ्यावा अशी मागणी बेळगाव सिटी लॉरी ओनर्स अँड एजंट असोसिएशनने सरकारकडे केली आहे.
बेळगाव सिटी लॉरी ओनर्स अँड एजंट असोसिएशनतर्फे संजय गोटाडकी, गुरुदेव पाटील, हेमंत लेंगडे व सुजय गोटाडकी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपरोक्त मागणीचे निवेदन आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून ते त्वरेने सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
कर्नाटक सरकारकडून 6 टनापर्यंतच्या हलक्या व्यावसायिक वाहनांच्या वाहतुकीवर आजीवन कर आकारला जात आहे. असे न करता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वाहतूक मंत्र्यांनी हा आजीवन कर मागे घ्यावा ही विनंती, अशाच तपशील निवेदनात नमूद आहे.
लॉरीवर जो कर चाळीस हजार रुपयात व्हायचा तो दोन ते अडीच लाख रुपयां पर्यंत अवाजवी वाढविण्यात आला आहे.आजच्या घडीला लॉरी मालक जेमतेम व्यवसाय करून उपजीविका करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे अश्यात सरकारकडून अवाजवी वाढवण्यात आलेला कर जीवघेणा ठरत आहे.
पूर्वी पासून असलेला कर लागू करावा नवीन वाढीव कर रद्द करावा अशीही त्यांनी मागणी केली आहे.लॉरी पंधरा वर्षात स्क्रॅप करा असा जाचक नियम देखील त्रासदायक ठरत आहे असेही निवेदनात म्हटले आहे.