Saturday, December 7, 2024

/

ए टी एम मधून पैसे काढताना सावधान रहा कारण

 belgaum

बेळगाव लाईव्ह:एटीएम धारकांनी पैसे काढताना सावध राहण्याची गरज आहे क कारण एटीएम मधून पैसे काढून देतो म्हणून फसवण्याचे प्रकार वाढले आहेत.

बेळगाव सह बेळगाव जिल्ह्यामध्ये भामट्यांची टीम सक्रिय झाली आहे नुकताच बेळगाव तालुक्यातील बेळवटी गावातील वयस्कर नागरिक पुंडलिक चन्नप्पा पाटील हा व्यक्ती एटीएम मधून पैसे काढण्यासाठी म्हणून भारतीय स्टेट बँक च्या एटीएम कडे गेली असता एकट्या भामट्याने मी तुमचे पैसे काढून देतो म्हणून त्यांच्याकडील एटीएम मागून घेतले आणि त्या एटीएम मधून पैसे येत नसल्याचे सांगत त्याचे एटीएम आपल्याकडे ठेवून घेतले .

आपल्याकडे असलेले एटीएम त्याला दिले आणि हा तिथून पसार झाला आणि लागलीच त्याने बेळगाव येथील रिसालदार गल्ली भारतीय स्टेट बँक एटीएम मधून तब्बल चार वेळा काढली आणि ही एकूण रक्कम 40 हजार त्या एटी मधून काढून घेतले हा व्यक्ती तोंडाला मास्क व पाटील कॉलेज बॅग घेऊन एटीएम कडे थांबला होता.

ग्रामीण भागातील अथवा वयस्कर व्यक्ती पाहूनच पद्धतशीर त्या व्यक्तींना फसवण्याचे काम ही सक्रिय टीम काम करत आहे एवढेच नसून या व्यक्तीने हे एटीएम दुसऱ्याला देऊन पुन्हा गोकाक येथील व्यक्तीला असेच गंडवले आहे गोकाक मधील व्यक्तीचे एटीएम पुन्हा एकदा व्यक्तीला देण्यासाठी म्हणून त्यांनी गुलबर्गा तालुक्यातील उदगीर गावच्या गंगम्मा या वयस्कर महिलेला हे अशाच पद्धतीने तिच्याकडील एटीएम घेऊन तिलाही 33 हजाराला गंडवले आहे.Atm frod

आता सावध राहण्याची वेळ आली असून एटीएम बॉक्स समोर किंवा आजूबाजूला उभारलेल्या अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नका कारण ही व्यक्ती अगदी चातुर्याने जो व्यक्ती शिकलेला नसेल त्याला पार्कून त्याचे एटीएम घेऊन आपले एटीएम देऊन त्याला फसवण्याचे काम करत आहेत असाच एक प्रकार बेळगाव मध्ये उघडकीस आला आहे.

तो vdo सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला हा व्हिडिओ कोणालाही स्वतःचे एटीएम देऊ नये अन्यथा विनाकारण फसवणूक करणाऱ्या टोळीमध्ये अडकू नका जर आपणाला एटीएम मधून पैसे काढता येत नसतील तर एखाद्या घरातील विश्वासू व्यक्तीला घेऊन किंवा बँकशी संपर्क साधून आपले पैसे व्यवस्थित रित्या काढून घ्यावे असे बँक कडून कित्येक वेळा सांगितले जाते तरीदेखील अशा व्यक्तींना बळी पडण्याचे प्रकार बेळगाव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी घडत आहेत या टोळीला पोलीस जेरबंद करणार का ही वेळच सांगणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.