बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेने बेकायदा प्लास्टिकविरोधात कारवाई केली असून सलग चौथ्या दिवशी शंभर किलो प्लास्टिक जप्त केले असून 38600 रूपयांचा दंड वसूल केला. शहरातील विविध दुकांनांवर छापा टाकण्यात आला.
महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या सूचनेनुसार गेल्या महिन्यापासून सिंगल यूज प्लास्टिक जप्त करण्यात येत आहे. शहरातील दुकानांवर छापे टाकण्यासाठी दोन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शुक्रवारी एकीकडे अतिक्रमण हटाव पथक तर दुसरीकडे प्लास्टिक विरोधी मोहीम वाढवण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत शंभर किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर 38600 रूपयांचा दंड वसूल केला.
ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिकेने कळवले आहे. त्यामुळे प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.