बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारच्या अन्नभाग्य योजनेअंतर्गत ऑगस्टमधील तांदळाची रक्कम काल गुरुवारपासून लाभार्थींच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली असून डीबीटीद्वारे जिल्ह्यातील 8 लाख 97 हजार 747 कुटुंबांच्या खात्यावर एकूण 50 कोटी 67 लाख 49 हजार 260 रुपये जमा होणार आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील अंत्योदय आणि बीपीएल रेशन कार्डधारकांना जुलैपासून राष्ट्रीय अन्न सुरक्षितता कायद्यांतर्गत एकूण 10 किलो तांदूळ देण्याची योजना होती. मात्र सध्या 5 किलो तांदूळ देण्यात येत असून उर्वरित 5 किलो तांदळा ऐवजी 34 रुपये किलो प्रमाणे लाभार्थींच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा करण्यात येत आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे ऑगस्ट अखेरपर्यंत एकूण 30 लाख 73 हजार 726 लाभार्थींच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. जुलै महिन्यात जिल्ह्यातील एकूण 8 लाख 29 हजार अंत्योदय आणि 28 लाख 14 हजार 882 बीपीएल लाभार्थींच्या बँक खात्यावर एकूण 46 कोटी 54 लाख 18 हजार 520 रुपये डीबीटीद्वारे जमा करण्यात आले आहेत.