मान्सूनच्या मोसमात काश्मीरमधील लोकप्रिय व तितकाच आव्हानात्मक समजला जाणारा ‘ग्रेट लेक्स ट्रेक’ हा ट्रेक बेळगावातील सिटी होम्स गार्डन सोसायटीमधील उत्साही तरुणांच्या गटाने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
काश्मीरमधील ग्रेट लेक्स ट्रेक हा पावसाळ्यातील सर्वात आव्हानात्मक ट्रेक समजला जातो. हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी किमान सात दिवस लागतात.
ट्रेकिंगच्या दृष्टीने आव्हानात्मक समजला जाणारा ग्रेट लेक्स ट्रेक हा 13,750 फूट उंच आणि 75 कि. मी. अंतराचा आहे.
हा ट्रेक पूर्ण करणे म्हणजे ट्रेकिंग करणाऱ्यांच्या जीवनातील एक अभिमानाचा अविस्मरणीय क्षण असतो. अलीकडेच शहरातील सिटी होम्स गार्डन सोसायटीमधील मोहित मोदी, कृतिक मोदी, दर्शन शहा, हर्ष चव्हाण,
मोहम्मद मोहीउद्दिन, सायम जैन, आणि श्रेयस पिसे या उत्साही तरुणांच्या गटाने सदर आव्हानात्मक ट्रॅक पूर्ण केला आहे. ग्रेट लेक्स ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर या तरुणांनी तिरंगा फडकावून आपला आनंद व्यक्त केला.