मेंदूतील रक्तस्त्रावामुळे मृत्यूशी झगडणारे आपले पती राकेश माने (वय 34) यांच्या खर्चिक वैद्यकीय उपचारासाठी शहरातील स्नेहल माने यांनी दानशूर व्यक्ती आणि सेवाभावी संघ-संस्थांसह शहरवासीयांकडे आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
उच्च रक्तदाबामुळे मेंदूच्या उजव्या भागात रक्तस्त्राव झाल्यामुळे राकेश माने यांच्यावर गेल्या 29 मे 2023 पासून उपचार सुरू आहेत. त्यामुळे तीन आठवडे कोमामध्ये गेलेल्या राकेश यांना त्या काळात शरीराच्या उजव्या बाजूला अर्धांग वायू झाला.
राकेश माने यांच्यावरील उपचारासाठी सुमारे 6 लाख रुपये खर्च येणार असून आतापर्यंत त्यांच्या कुटुंबीयांनी कशीबशी पैशाची उभारणी केली. उपचारामुळे प्रकृती सुधारत असतानाच गेल्या 20 जुलै रोजी राकेश यांची प्रकृती पुन्हा गंभीर झाली आणि आता त्यांच्या मेंदूच्या डाव्या बाजूवर परिणाम झाला आहे.
सध्या त्यांच्यावर शहरातील एका अत्याधुनिक अतिदक्षता विभाग असलेल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यासाठी औषध रिपोर्ट्स, स्कॅन्स व इतर अतिरिक्त खर्चासह हॉस्पिटल कडून प्रतिदिन 25,000 रु. शुल्क आकारले जात आहे.
हा खर्च माने कुटुंबीयांच्या आवक्या बाहेरील असल्यामुळे आपल्या पतिवरील उपचारासाठी बेळगावकरांनी उदारता दाखवून आर्थिक मदत करावी असे आवाहन राकेश यांची पत्नी स्नेहल माने यांनी केले आहे. स्नेहल यांना एक मुलगा असून आतापर्यंत जमवलेले त्यांचे सर्व पैसे यापूर्वीच्या उपचारावर खर्च झाले आहेत.
त्यांना आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्यांनी पुढील बँक खात्यावर आपली मदत जमा करावी. बँक ऑफ इंडिया ए/सी नं. : 110010110024680, आयएफएससी कोड : बीकेआयडी0001100, दोड्डणावर कॉम्प्लेक्स पी. बी. रोड बेळगाव.
जीपे फोन किंवा पे नंबर : स्नेहल राकेश माने (रुग्णाची पत्नी) 7899520629.