Saturday, May 4, 2024

/

जिल्हाभरातील शाळा, अंगणवाडी केंद्रांना गुरुवारी सुट्टी जाहीर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : पावसाच्या अंदाजामुळे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना गुरुवारी (27 जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बजावला आहे.

गुरुवारी बेळगाव साठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केल्याने मुलांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाभरातील शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना सुट्टी देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बेळगाव जिल्हा माहिती अधिकारी गुरुनाथ कडबुर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गुरुवारी शाळांना सुट्टीच्या आदेशाची माहिती दिली आहे. बुधवारी देखील जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शाळांना सुट्टी होती गुरुवारी मात्र संपूर्ण जिल्ह्यातील सर्वच शाळांना सुट्टी असणार आहे.

 belgaum

काल बुधवारी रात्री जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी फ्लॅश फ्लड अलर्ट देत पुराच्या ठिकाणी जनतेने जाऊ नये असे आवाहन केले होते.Nitesh patil dc

पर्यटकांना धबधब्यांना भेट देण्यास कडक निर्बंध : डीसींचे आदेश

बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना जाहीर केल्या आहेत.खबरदारीचा उपाय म्हणून, परिसरातील सर्व धबधब्यांमध्ये प्रवेश पूर्णपणे प्रतिबंधित करण्याचा आदेश बजावला आहे.

धबधब्याजवळ जात असताना रस्ता खचल्याने लोकांना जीव गमवावा लागल्याच्या दुःखद घटना राज्यभरात नोंदवण्यात आल्या आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील धबधब्याजवळील हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, वनक्षेत्रातील धबधब्यांमध्ये सार्वजनिक प्रवेश आधीच प्रतिबंधित आहे.

मात्र, तरीही पर्यटकांना गोकाकसारखे जिल्ह्यातील काही प्रसिद्ध धबधबे सुरक्षित अंतरावरून पाहण्याची संधी मिळणार आहे. या भागांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी वनविभागासह टूर गाईड आणि पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

या धबधब्यांना भेट देताना पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी आणि संभाव्य धोकादायक ठिकाणांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले आहे. तुमची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे असेही पाटील म्हणाले.

गुरुवारी शाळा सुट्टींचा आदेश

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.