विशाल भंडारी यांचे सी.ए. परीक्षेत सुयश
संभाजीनगर, वडगाव, येथील रहिवासी विशाल प्रकाश भंडारी याने गेल्या मे 2023 मध्ये झालेल्या सी.ए. अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होत अभिनंदन यश मिळविले आहे.
सी.ए. अंतिम परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विशाल भंडारी याला एस. अनंता अँड कंपनी बेंगलोर आणि सी.ए. विनायक असुंडी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. विशालने जैन कॉलेज ऑफ कॉमर्समधून अव्वल श्रेणीमध्ये त्याने वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली आहे. संभाजीनगर वडगाव येथील प्रतिष्ठित नागरिक प्रकाश करवीर भंडारी व मंजुळा प्रकाश भंडारी यांचा तो चिरंजीव आहे. सीए परीक्षेतील यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
वृषभ अगरवाल यांचे सीए परीक्षेत सुयश
कचेरी गल्ली, शहापूर येथील रहिवासी वृषभ दीपक अग्रवाल यांनी गेल्या मे 2023 मध्ये घेण्यात आलेली सीए अंतिम परीक्षा उत्तीर्ण होऊन अभिनंदन यश मिळविले आहे.
सीए परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी वृषभ यांना मराठे -हारगुडे अँड कंपनी तसेच सीए विनायक असुंडी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. शालेय जीवनापासून एक हुशार विद्यार्थी म्हणून सुपरिचित असलेल्या वृषभ अग्रवाल यांचे माध्यमिक शिक्षण ओरिएंटल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण जैन कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये झाले आहे.
जैन कॉलेज ऑफ कॉमर्स मधून त्यांनी अव्वल श्रेणीत वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली आहे. कचेरी गल्ली, शहापूर येथील प्रतिष्ठित नागरिक दीपक चंपकलाल अग्रवाल व कविता दीपक अग्रवाल यांचे ते चिरंजीव आहेत. सीए परीक्षेतील यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.