Sunday, May 5, 2024

/

‘शक्ती’अंतर्गत २.५५ कोटी महिलांचा प्रवास

 belgaum

‘ बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारने जारी केलेल्या शक्ती या महिलांसाठीच्या मोफत बसप्रवास योजने अंतर्गत आतापर्यंत तब्बल २.५५ कोटी महिलांनी प्रवास केला असून महिला प्रवाशांच्या तिकीटाची किंमत ६४.९३ कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे.

महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या कर्नाटकातील महिलांसाठी सरकारी बसमधून राज्यात मोफत प्रवास करण्याच्या “शक्ती” योजनेला अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. वायव्य कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळाच्या अखत्यारीतील धारवाड, बेळगाव, बागलकोट, गदग, हावेरी आणि उत्तरा कन्नड या सहा जिल्ह्यांतील ९ परिवहन विभागाच्या बसमधून ११ ते ३० जून या कालावधीत एकूण २५५०४८५१ महिलांनी प्रवास केला आहे. या २० दिवसात महिलांनी केलेल्या प्रवासाच्या तिकीटाची किंमत ६४९३४४८१८ इतकी झाली आहे.

शक्ती योजना लागू झाल्यानंतर महिला प्रवाशांसह पुरुष प्रवाशांची संख्याही वाढली असून, परिणामी एकूण प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. शक्ती योजना लागू होण्यापूर्वी १ ते १० जून दरम्यान पुरुष आणि महिलांसह एकूण १७४.८४ लाख लोकांनी प्रवास केला होता. रोजची सरासरी १७.४८ लाख होती.Shakti scheme

 belgaum

योजनेच्या अंमलबजावणीनंतर, ११ ते ३० जून या २० दिवसांच्या कालावधीत २.५५ कोटी महिला आणि २.१८ कोटी पुरुषांसह एकूण ४.७४ कोटी लोकांनी प्रवास केला आहे.

दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सरासरी संख्या २३.६८ लाख झाली असून ही योजना लागू होण्यापूर्वी एकूण प्रवाशांमध्ये महिलांचे प्रमाण ४० ते ४५ टक्के असायचे, आता ते ५५ ते ६० टक्के झाले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.