Monday, May 13, 2024

/

दूध सागर धबधब्या पर्यटकांची तोबा गर्दी

 belgaum

रेल्वे रुळावरून दूधसागर धबधब्याच्या ठिकाणी जाणाऱ्या शेकडो युवकांना रेल्वे पोलिसांनी वाटेतच रोखून माघारी धाडल्याची, तर धबधबा पाहून माघारी येणाऱ्यांना धडा शिकवताना त्यांना खुलेआम ‘उठक बैठक’ करण्याची सामूहिक शिक्षा दिल्याची घटना आज रविवारी सकाळी घडली.

पावसाळ्यात धबधब्याची ठिकाण धोकादायक बनत आहेत. यापूर्वी खानापूर तालुक्यातील धबधब्यांच्या ठिकाणी अनेक दुर्घटना घडून बऱ्याच जणांना प्राण गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर यंदा वनविभागाने पर्यटकांना कांही धोकादायक धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास निर्बंध घातले आहेत. गोवा सीमेवरील सुप्रसिद्ध दूधसागर धबधबा देखील त्याला अपवाद नाही. रेल्वे मार्गावरून थेट या धबधब्याच्या पायथ्यापर्यंत जाता येते. मात्र संभाव्य धोका लक्षात घेऊन दुर्घटना टाळण्यासाठी या पद्धतीने धबधब्यापर्यंत जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

पावसाळ्यात धारवाड मधून आणि बेळगाव व गोव्याकडून लोंढा मार्गे हजारो पर्यटक विलोभनीय दूधसागर धबधबा पाहण्यासाठी येत असतात. बेळगाव, धारवाड तसेच अन्य परगावच्या पर्यटकांसाठी दूधसागर धबधबा हा मोठे आकर्षण आहे. विशेष करून सुट्टीच्या दिवशी हा धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते. पर्यटकांसाठी पर्यटन विभागाकडून सुरक्षित अंतरावरून धबधबा पाहण्याची सोय करण्यात आली आहे. तथापि त्याचा लाभ न घेता बंदी आदेश धुडकावून अतिउत्साही युवावर्ग हुल्लडबाजी करत रेल्वे रुळावरूनच धबधब्याच्या ठिकाणी जात असतो. याची गंभीर दखल घेत रेल्वे पोलीसानी आज संबंधित युवा पर्यटकांवर कारवाई केली. रेल्वे रुळावरून दूध सागरकडे जाणाऱ्या शेकडो युवकांना आज रविवारी रेल्वे पोलिसांनी अर्ध्यावर रोखून माघारी धाडले. त्याचप्रमाणे नजर चुकवून धबधबा पाहून परत येणाऱ्या युवकांना धडा शिकवताना त्यांना चांगली समज देण्याबरोबरच दंडा दाखल रेल्वे रुळाशेजारी सामूहिक बैठका मारण्याची शिक्षा केली.Rush dudhsagar

 belgaum

दरम्यान, बेळगाव येथून शेकडोच्या संख्येने दूधसागरचा धबधबा पाहण्यासाठी जाणारे युवक पूर्वी लोंढा मार्गे सायंकाळच्या निजामुद्दीन एक्सप्रेसने बेळगावला माघारी परतत होते. कारण त्यावेळी या रेल्वेला पुरेसे सेकंड क्लास व सामान्य कोच (डबे) जोडलेले होते. मात्र आता अलीकडेच या रेल्वेची कोच व्यवस्था बदलण्यात आली आहे.

सध्या निजामुद्दीन एक्सप्रेसला फक्त दोन स्लीपर कोच असून इतर सर्व एसी कोच आहेत. त्यामुळे स्लीपर कोचमध्ये गर्दी करण्याबरोबरच अतिउत्साही युवक एसी कोचमध्ये घुसून विना तिकीट बेळगावपर्यंत येत आपल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.