Thursday, January 9, 2025

/

अखेर मिळाला मुहूर्त; म. ए. समितीची उद्या बैठक

 belgaum

विधानसभा निवडणुकीनंतर ‘म्युट’वर गेलेल्या बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीने अखेर बैठक बोलावली असून कार्यकर्त्यांची ही बैठक उद्या रविवार दि. 30 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे.

रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील मराठा मंदिरच्या सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर आणि चिटणीस माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.

समितीने नेते या बैठकीत आपली मते मांडणार आहेत पुढील रणनीती लढ्याची दिशा ठरवण्यासाठी समितीची ही बैठक होत असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

विधान सभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कोणतीच बैठक घेण्यात आली नव्हती मात्र रविवारी ही बैठक बोलावण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.