गेल्या सहा दिवसापासून सतत होत असलेल्या पावसाने खानापूर तालुक्यात सर्वच नदी नाले उसळी भरून वाहत आहेत.
लोंढ्या जवळ नव्याने बांधण्यात आलेला पूल खचला आहे,मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.
लोंढ्या जवळ नव्याने बांधण्यात आलेला पूल आज रविवारी सकाळी एका बाजूने खचला असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.
नवा पूल खचल्यामुळे या पुलाच्या बांधकामाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पुलाच्या कंत्राटदार आणि महामार्ग प्राधिकरण कारभाराचा फटका जनतेला बसत आहे.