इंडिगो एअरलाईन्सच्या ए-320 विमानाने बेळगाव विमानतळाच्या धावपट्टी 26 वर इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम (आयएलएस) अर्थात उपकरण अवतारण पद्धतीची चांचणी मोहीम यशस्वीरित्या पार पडली.
हे यश अधिक उल्लेखनीय याच्यासाठी आहे की ही संपूर्ण मोहीम विमानातील आणि एटीसी टॉवर मधील महिला अधिकाऱ्यांनी हाताळली.
इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम चांचणी यशस्वी करणाऱ्या इंडिगोच्या ए-320 विमानातील वैमानिक आणि सहवैमानिकासह संपूर्ण कर्मचारीवर्ग महिलांचा होता.
त्याचप्रमाणे चांचणी मोहीम हाताळणाऱ्या एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) टॉवरमधील अधिकारी देखील महिलाच होत्या.
थोडक्यात बेळगाव विमानतळाच्या रन-वे अर्थात धावपट्टीवर इंडिगो ए-320 विमानाच्या इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमची चांचणी मोहीम यशस्वी होण्याचा तो क्षण स्त्री शक्तीचे प्रदर्शन घडविणारा होता.
Today Indigo,A320 from #Hyderabad to #Belgaum, successfully completed the #ILS trial operation at Runway 26.We wish #AAI and #Indigo team for this achievement. (1/2)#BelagaviAirport @AAI_Official@AAIRHQSR @MoCA_GoI @RGIAHyd @IndiGo6E pic.twitter.com/6FgyxSqDkj
— Belagavi Airport ಬೆಳಗಾವಿ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ (@aaiblgairport) July 31, 2023
ILS trial operation by IndigoA320 @aaiblgairport,All operation done by Women officers in sky as well in ATC tower,proud moment.@allaboutbelgaum @AAI_Official @Belagavi_infra @belagavi_news @Yellows86099980 @IndiGo6E @indigoairpnr @Indigoofficialc @BelagaviT pic.twitter.com/9eKw55Q1ko
— Richa goswami (@richa_caet2004) July 31, 2023