Tuesday, April 16, 2024

/

5 ऑगस्टला प्रदर्शित होणार “दडपण” चित्रपट

 belgaum

गेल्या कांही महिन्यापासून बेळगावचे रसिक प्रेक्षक ज्याच्या प्रतीक्षेत होते तो अस्मिता क्रिएशनचा आपल्या बेळगावचा मराठी चित्रपट “दडपण” आता विराम आत्महत्येला, येत्या शनिवारी म्हणजेच 5 ऑगस्ट 2023 रोजी ग्लोब थिएटर येथे प्रदर्शित होत आहे.

बेळगाव मध्ये चित्रीकरण झालेला “दडपण” हा चित्रपट संपूर्ण कर्नाटकात निर्माण झालेला पहिला मराठी चित्रपट असल्याचे उत्तर कर्नाटका फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स यांनी नुकतेच जाहीर केले आहे. ही समस्त बेळगावकरांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

या चित्रपटात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येसारखा एक महत्त्वपूर्ण गंभीर विषय हाताळून प्रेक्षकांसमोर समोर मांडण्यात आला आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर कोणत्याही विद्यार्थी अथवा कोणत्याही व्यक्तीच्या मनातून आत्महत्येचा विचार कायमस्वरूपी निघून जाईल, अशी अपेक्षा चित्रपटाचे निर्माते राजेश लोहार आणि लेखक /दिग्दर्शक संतोष सुतार यांनी व्यक्त केली आहे.

 belgaum

Dadpan

दडपण चित्रपटाचे छायाचित्रण व संपादन रोहित सुतार, संगीत दिग्दर्शन गगनदीप कुरळे तसेच डबिंग व संगीत संयोजन अनिकेत हेरंजाळ यांनी केले असून चित्रपटाचे प्रसिद्धी डिझायनर प्रशांत शेबण्णावर हे आहेत.

तरी कृपया बेळगावच्या कलाकारांच्या अभिनयाची एक उत्कृष्ट कलाकृती असलेला हा चित्रपट सर्व पालक व विद्यार्थीवर्गाने पाहणे अत्यंत आवश्यक आहे. ग्लोब चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची संपूर्ण टीम ही बेळगावची आहे हे विशेष होय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.