Tuesday, December 3, 2024

/

गृहलक्ष्मी योजनेसाठी कसा करावा अर्ज

 belgaum

गृहलक्ष्मी योजना ही कर्नाटक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून जिच्याद्वारे बीपीएल, एपीएल अथवा अंत्योदय कार्डधारक कुटुंबातील महिला प्रमुखाला डीबीटीच्या माध्यमातून दरमहा 2000 रुपये मानधन दिले जाते.

गृहलक्ष्मी योजनेसाठी कसा अर्ज करावा. 1) सदर योजनेसाठी लाभार्थींची नांव नोंदणी येत्या 19 जुलै 2023 पासून सुरू होणार आहे. 2) यापूर्वी अधिसूचित केल्याप्रमाणे रेशन कार्ड वरील कुटुंब प्रमुख महिला या योजनेसाठी पात्र असेल. मात्र कुटुंब प्रमुख महिला किंवा तिचा पती आयकर अथवा जीएसटी करदाता नसावा. 3) गृहलक्ष्मी योजनेसाठी पुढील दोन पैकी कोणत्याही एका पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. अ) प्रत्येक रेशन कार्डधारक महिला कुटुंबप्रमुखाला नांव नोंदणीची तारीख, वेळ आणि स्थळ सूचित केले जाईल.

त्यानुसार त्यांनी त्यांनी संबंधित स्थळी जाऊन योजनेसाठी नांव नोंदणी करावयाची आहे. ग्रामीण भागासाठी ना नोंदणीचे स्थळ नजीकचे ग्राम -वन केंद्र किंवा बापूजी सेवा केंद्र हे असेल. शहरी भागासाठी जवळचे कर्नाटक -वन केंद्र किंवा बेंगलोर वन सेवा केंद्र असेल. ब) दुसरा पर्याय म्हणजे एक ‘प्रजा प्रतिनिधी’ (किंवा सरकार मान्य स्वयंसेवक) घरोघरी भेट देऊन नांव नोंदणी करून घेईल. 4) नांव नोंदणी साठीची तारीख वेळ आणि स्थळाबाबत नागरिक 1902 क्रमांकावर फोन करून अथवा 8147500500 या क्रमांकावर एसएमएस /व्हाट्सअप मेसेज करून चौकशी करू शकतात.

5) काही कारणास्तव लाभार्थींना नांव नोंदणीसाठी ग्राम वन /केंद्र बापूजी सेवा केंद्र /कर्नाटक वन केंद्र /बेंगलोर वन सेवा केंद्राच्या ठिकाणी सुचित केलेल्या वेळी जाता येणे शक्य नसेल तर ते त्याच स्थळी त्याच दिवशी किंवा इतर दिवशी सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत जाऊन आपले नांव नोंदवू शकतात. 6) नांव नोंदणी वेळी लाभार्थींना आपला रेशन कार्ड नंबर आधार कार्ड नंबर आणि बँक खात्याचा तपशील पासबुकसह सादर करावा लागेल (जर लाभार्थींना आधार कार्ड लिंक बँक अकाउंटला योजनेची रक्कम जमा होणे नको असेल तर). 7) ग्राम -वन /बापूजी सेवा केंद्र /कर्नाटक -वन /बेंगलोर वन सेवा केंद्राच्या ठिकाणी नांव नोंदणी झाल्यानंतर मंजुरी प्रमाणपत्र दिले जाईल. 8) जर नांव नोंदणी प्रजा प्रतिनिधीकडून झाली असेल तर मंजुरी प्रमाणपत्र लाभार्थींच्या घरपोच पाठविले जाईल.Gruh laxmi

9) प्रजा प्रतिनिधी किंवा अन्य सेवा केंद्राच्या ठिकाणी नाव नोंदणी झाल्यानंतर मंजुरीचा लेखी संदेश लाभार्थींनी नाव नोंदणी प्रसंगी दिलेल्या त्यांच्या मोबाईल नंबर वर एसएमएसद्वारे धाडला जाईल. 10) ग्राम -वन /बापूजी सेवा केंद्र /कर्नाटक -वन /बेंगलोर -वन सेवा केंद्राच्या ठिकाणी पूर्वीच नांव नोंदणी झाले असेल तर घरोघरी जाणाऱ्या प्रजा प्रतिनिधींना सिस्टीमवर तशी माहिती मिळेल. 11) लाभार्थींच्या आधार नंबरशी लिंक असणाऱ्या बँक अकाउंट वर दरमहा डीबीटीच्या माध्यमातून 2000 रुपये जमा केले जातील. लाभार्थीची इच्छा असेल तर ते आपले नवे बँक खाते उपलब्ध करून देऊ शकतात. ज्यामध्ये आरटीजीएस माध्यमातून 2000 रुपये जमा केले जातील. 12) नाव नोंदणीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची गरज नाही. 13) नांव नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे मोफत असेल. 14) नांव नोंदणीसाठी कोणतीही अंतिम तारीख नाही.

दरम्यान, गृहलक्ष्मी योजनेच्या शुभारंभास सोमवारी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते येऊ शकत नसतील तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते येत्या बुधवारी या योजनेचा शुभारंभ केला जाईल, अशी माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज शनिवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिली.

गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत राज्यातील सर्व कुटुंबप्रमुख महिलांना दरमहा 2000 रुपये मानधन दिले जाईल. ज्यांच्याकडे एपीएल, बीपीएल आणि अंत्योदय कार्ड आहे असे सर्वजण या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तथापि आयकर आणि जीएसटी भरणाऱ्यांसाठी ही योजना लागू नसेल असे मंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच नांव नोंदणीसाठी कोणतीही अंतिम तारीख नाही. कारण ही अवरीत सलग चालणारी प्रक्रिया आहे असेही त्या म्हणाल्या. गृहलक्ष्मी योजनेसंदर्भातील चौकशीसाठी नागरिकांनी 8147500500 या क्रमांकावर एसएमएस च्या माध्यमातून किंवा हेल्पलाइन नंबर 1902 वर संपर्क साधावा, असे आवाहन करून सदर योजनेच्या नाव नोंदणीसाठी जर कोणी पैशाची मागणी केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही मंत्री हेब्बाळकर यांनी दिला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.