Monday, December 23, 2024

/

हेस्कॉम, बीसीसीआयचा संयुक्त जनजागृती कार्यक्रम

 belgaum

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (बीसीसीआय) आणि हेस्कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हेस्कॉमच्या विविध योजनांसंदर्भातील जनजागृती कार्यक्रम नुकताच उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.

उद्यमबाग येथील बीसीसीआयच्या सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमास हेस्कॉम वित्त विभागाचे संचालक प्रकाश पाटील, मुख्य अभियंता प्रकाश व्ही., नियंत्रणाधिकारी एस. ए. सिंदूर, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल, लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष महादेव चौगुले, प्रभाकर नागरमुन्नोळी, सचिव स्वप्निल शहा आदींसह हेस्कॉमचे वरिष्ठ अधिकारी व बीसीसीआयचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

हेस्कॉमचे व्यवस्थापकीय संचालक मोहंमद रोशन यांनी सदर कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहात बेळगावच्या ग्राहकांना उत्तम सेवा दिली जाईल अशी ग्वाही दिली. कार्यक्रमात औद्योगिक (एलटी5) ग्राहकांसाठीची 50 पैसे सवलतीची योजना,

पूर्वी घरगुती ग्राहकांसाठी असलेले मात्र आता 50 केडब्ल्यू आणि त्यापेक्षा जास्त वीजपुरवठा मंजूर झालेल्या औद्योगिक आणि व्यावसायिक (एलटी3) ग्राहकांसाठीची वीज दरातील सवलतीची योजना दररोज रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंतच्या विजेच्या वापरावर प्रति युनिट 2 रुपये सूट असणारी विशेष प्रोत्साहनपर योजना आदी योजनांबाबत जनजागृती करण्यात आली.

हेस्कॉमच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी यावेळी सुमारे 300 हून अधिक औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांनी अर्ज केले. योजनांची संबंधित कागदपत्रे गोळा करण्यासाठी हेस्कॉमचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रकाश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी ग्राहकांना मदत केली.

कार्यक्रमास बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजसह लघु उद्योजक संघटना, मायक्रो इंडस्ट्री असोसिएशन, इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमन आदी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.