Friday, October 18, 2024

/

धबधबा परिसरात मौजमजा; चार जणांविरुद्ध तक्रार

 belgaum

जिल्हाधिकारी आणि वनखात्याच्या निर्बंधाचे उल्लंघन करून बटवडे फॉल्स या धबधबा परिसरातील जंगलात मौजमजा केल्याप्रकरणी 4 जणांविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्बंधाचे उल्लंघन करून बटवडे फॉल्स या धबधबा परिसरातील जंगलात कांही जणांनी मौजमजा केल्याची घटना समोर आली आहे.

जंगलात मौजमजा करणाऱ्यांपैकी 4 जण हेस्कॉमचे कर्मचारी असून त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली जावी असे निर्देश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी उप वनसंरक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. पावसाळ्यात धबधब्यांच्या ठिकाणी कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी वन खात्याने सध्या धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास निर्बंध घातले आहेत.

पावसाळ्यामध्ये धबधब्याच्या ठिकाणचा निसर्ग विलोभनीय असला तरी जागोजागी क्षणात होत्याचे नव्हते करणारे धोके असतात. धबधब्याच्या ठिकाणी अथवा येथील परिसरात केलेले अतिधाडस, पाण्याशी केलेली मस्ती, स्टंटबाजी युक्त सेल्फी अनेकांच्या जीवावर बेतली आहे.Forest. Case

जंगलातील धोक्यांची सुतराम कल्पना नसणारे अनेक जण अपघातग्रस्त होतात. यासाठी सध्या पावसाळ्यात धबधबा परिसरात जाण्यास जिल्हाधिकारी व वनखात्याने निर्बंध घातले आहेत. तसेच निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

मात्र तरीही जीवावर उदार झालेल्या कांही अतिउत्साही मंडळींकडून या निर्बंधाचे उल्लंघन केले जात आहे. दरम्यान, नजर चुकवून चिखले, आमटे, हब्बनहट्टी आणि जांबोटी परिसरातील धबधबे पाहून येणाऱ्यांना किणये या गावी अडवून चौकशी करण्याद्वारे पोलीस त्यांना दंड आकारत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.