बेळगाव लाईव्ह : अलीकडेच वीज बिलांमध्ये निश्चित शुल्क आणि इंधन खर्च समायोजन शुल्क (FAC) किंवा इंधन आणि वीज खरेदी खर्च समायोजन शुल्क (FPPCA) वाढल्याने ग्राहकांना गेल्या महिन्यापासून धक्का बसला आहे. जुलै महिन्यात आणि येत्या ऑगस्ट महिन्यातही हे शुल्क कायम राहणार असून नव्या बदलानुसार वीज बिलांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
वीजबिल देताना मीटर रिडींग घेण्यात येते. वीजबिलात महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या शुल्कापैकी एक असणारे म्हणजेच इंधन समायोजन शुल्क. (FAC म्हणजेच fuel adjustment charge) म्हणून ओळखले जाते.
हे शुल्क वीजबिलात जोडले जाते आणि इंधनाच्या किमतींवर आधारित दर महिन्याला बदलते . ग्राहकांना हे शुल्क आणि त्यांची वीज बिले अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्यांची गणना कशी केली जाते याबद्दल जागरूक असणे महत्त्वाचे आहे
सध्या वाढीव वीजबिलात जुलै महिन्यासाठी एफएसी १.९१ प्रति युनिट आहे , तर मे महिन्यासाठी ते २.५५ इतके होते. आता ऑगस्ट महिन्यासाठी हे शुल्क १.४५ प्रति युनिट असेल, अशी माहिती कर्नाटक विद्युत नियामक आयोगाच्या (KERC) ३० जून २०२३ रोजीच्या आदेशात प्रकाशित करण्यात आली आहे.
ऊर्जा शुल्क हा वीजबिलाचा प्राथमिक घटक आहे, ज्यामध्ये इंधन, निर्मिती आणि प्रसारण, वितरण शुल्क आणि जनरेटरचा नफा यांचा समावेश आहे. कर्नाटकमध्ये, कर्नाटक विद्युत नियामक आयोग (KERC) हे शुल्क निश्चित करते. वीज पुरवठादार विविध स्लॅबवर आधारित ऊर्जा शुल्काची गणना करतात ज्यावर ग्राहकांकडून शुल्क आकारले जाते.