Wednesday, May 8, 2024

/

30 फूट खोल बोअरवेलमध्ये सापडले शरीराचे नऊ तुकडे

 belgaum

बेळगाव  लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडीजवळील हिरेकोडी येथील जैनमुनी कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आले आहे. जैनमुनी कामकुमार नंदी महाराज यांचा निर्दयी क्रूरपणे खून केल्याचे उघडकीस आले आहे. रायबाग जवळील कटकभावी गावाजवळ मृतदेहाचे 9 तुकडे बोअरवेलमधून काढण्यात आले आहेत.

जैन मुनीजी बुधवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार हिरेकोडी येथील जैन आश्रमातील भक्तांनी शुक्रवारी केली होती. भाविकांच्या तक्रारीच्या आधारे बेळगाव पोलिसांनी तपास सुरू केला होता बुधवारसह आदल्या दिवसांच्या घटनाक्रम तपासला. तपासादरम्यान आश्रमात कोणकोण आले, याची चौकशी करण्यात आली.
शनिवारी जैन मूनीचा मृतदेह सापडला. मारेकर्‍यांनी जैन मुनीचे दोन हात, दोन पाय, मांडीचे दोन भाग, डोके, पोटाचे दोन भाग कापून, मृतदेहाचे तुकडे तुकडे करून बोअरवेल मध्ये फेकून दिले होते.

खटकभावी गावच्या हद्दीतील बोअरवेलमध्ये मयताच्या शरीराचे तुकडे टाकून मारेकर्‍यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. बोअरवेलच्या 25 फूट खोलवर रक्ताने माखलेली साडी व टॉवेल आढळून आला. बोअरवेलमध्ये 30 फूट खोलीवर मृतदेहाचे 9 भाग सापडले आहेत .

 belgaum

Jain muni murder
जैन मुनींचे पार्थिव बेळगावला पाठवले
खून झालेल्या जैन मूनीचा मृतदेह खटकबावी येथून शल्य चिकित्सेकरिता बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून शनिवारी बेळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. उद्या रविवारी हिरेकोडी येथील नंदीपर्वत आश्रमात अंत्यसंस्कार करण्याचा निर्धार भाविकांनी केला आहे.

मृतदेह सापडल्यानंतर एसपी डॉ. संजीव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला सांगितले की शुक्रवारी दुपारी तक्रार आल्यानंतर चिक्कोडी पोलिसांनी तपास सुरू केला.तपासात सापडलेले पुरावे मिळवून माहिती संकलित केली.त्याच दिवशी रात्री स्वामीजींच्या ओळखीची व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी आल्याची माहिती समोर आली. तपासात एकाच व्यक्तीने खून केल्याचे निष्पन्न झाले.बेपत्ता झाल्याची घटना खुनाची झाली.आम्ही शोध घेतला.सध्या स्वामीजींचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक संजीव पाटील यांनी या कृत्याचे कारण शोधून तपास करण्यात येणार असल्याचे सांगितले.Bgm police jain muni

मृत देह शोधमोहीम आणि सुरक्षेसाठी 500 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते.
बेळगाव उत्तर विभागातील हुबली, धारवाड नगर, उत्तरा कन्नड जिल्ह्यातील कर्मचारी, डऊठऋ, डडङ, स्थानिक आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी सहकार्य केले असेही पोलीस अधीक्षक डॉ संजीव पाटील यांनी सांगितले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून स्वामीजींचा मृतदेह 30 फूट खोलवर आढळला असे सांगत एसपींनी आरोपींची नावे उघड करण्यास नकार दिला.

जमीन किंवा आर्थिक व्यवहारातून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून नेमेके कारण पोलीस तपासात स्पष्ट होणार आहे

 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.