भरगच्च पत्रकार परिषदेत पत्रकारांनी अनेक प्रशंसोबतच शेवटचा प्रश्न शरद पवार यांना विचारला. आता राष्ट्रवादीसमोर तुमच्यासमोर असलेला आश्वासक चेहरा कोण? या प्रश्नावर हसत हसत शरद पवार यांनी हात वर केला आणि ‘शरद पवार’ असे उत्तर दिले!! या उत्तरावर उपस्थित पत्रकारांनी पत्रकारिता विसरून कडाडून टाळ्या वाजवल्या. आणि शरद पवार पुन्हा एकदा जिंकले! महाराष्ट्रातील जनतेला आश्वासक वाटणारा लढाऊ चेहरा शरद पवारांनी परत एकदा महाराष्ट्रासमोर ठेवला.
आणि भाजपचे असणारे ‘सोवळेपण’ उघडे पाडले! चार दिवसांपूर्वी मोदींनी एनसीपी म्हणजे भारतातील सर्वात भ्रष्ट पक्ष, ७० हजार कोटीचा घोटाळा करणारा पक्ष असं जाहीर केलं आणि राष्ट्रवादीच्या पाहल्या फळीतील नऊ खेळाडूंनी भाजपच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
खरे चाणक्य कोण? याची सुई पुन्हा एकदा बारामतीकडे आली. आयटी सेल वाल्यांना सुई चाचपणे मुश्किल होऊन गेले. आता मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचा गट राष्ट्रवादीसोबत उद्धव ठाकरे गेले म्हणून आम्ही त्यांना सोडलं अशी वलग्ना करत होते. या पार्श्वभूमीवर भारतभर एकच नेता असा आहे, कि जो चाणक्य आहे! हे परत एकदा मानावे लागले.
आणि राष्टवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात आश्वासक चेहरा समोर आला. एक हि बंदा काफी है. आज एकीकडे अजितदादा पवार बांद्रा येथे आपल्या समर्थकांसमवेत, आमदारांसमवेत बैठक घेत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक बोलाविली आहे. दोन्ही बैठका एकाच दिवशी आयोजिण्यात आल्या आहेत. त्या बैठकीत यशवंतराव चव्हाण सभागृहासमोर बेळगावचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेसचे इंजिनियर सेलचे अध्यक्ष अमित देसाई यांच्या नेतृत्वाखाली हातात फलक घेऊन शरद पवार यांना जोरदार पाठिंबा दिला.
एक हि बंदा काफी है! अमित देसाई हे बेळगाव सीमाभागात वावरत असले तरी ते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंजिनियर सेलच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील इंजिनियरना जोडण्याचे काम ते करत आहेत. राष्ट्रवादीच्या अभियंत्यांनी शरद पवारांना अशा पद्धतीने हातात फलक घेऊन पाठिंबा दिला, हा फलक लक्षवेधी ठरला.
अनेकजण या फलकाकडे पाहून विचारपूस करत होते. आणि सगळ्यांच्याच एकच चर्चा सुरु होती.. एक हि बंदा काफी है…..!यावेळी रुपेश सिंघवी,अमृता काळदाते,दिनेश जगताप,चंद्रकांत कदम,कपिल कदम,रविराज मोहिते,मोहित माळी आदी इंजिनीअर्स उपस्थित होते.