बेळगाव लाईव्ह : बागेवाडी घाटात लहान आणि मोठ्या कंटेनरमध्ये झालेल्या धडकेत एकाच जागीच मृत्यू झाला असून या अपघातात दोघे जखमी झाले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील बड्डेकोळमठ क्रॉसनजीक हा अपघात झाला असून या अपघातात सांगलीतील वाळवा तालुक्यातील भवानीनगर येथील जयवंत ज्योतीराम एवारे (वय ४४) याचा जागीच मृत्यू झाला आहे.
तर बिहार राज्यातील जयनगर, कोडेरमा येथील महेश दास आणि पुण्यातील पंजलवाडी येथील शंकर नारायण चव्हाण हे दोघे जखमी आहेत. बेळगावहून धारवाडच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या गुड्स कंटेनर (वाहन क्रमांक एनएल ०१ क्यू १७०६) वाहनाच्या चालकाचे अतिवेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असून अतिवेग आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या अपघातात वाहन क्रमांक एनएल ०१ क्यू १७०६ ने वाहन क्रमांक एम एच १२, एचडी ६१२२ या वाहनाला धडक दिली असून याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंद करण्यात आली आहे.