belgaum

अंगणवाडी केंद्रामध्ये निकृष्ट आहार वाटपाचा आरोप खोटा – चेतनकुमार

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथील अंगणवाडी केंद्रामध्ये मुदत संपलेल्या निकृष्ट माध्यान्ह आहाराचे वितरण करण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण महिला आणि बाल कल्याण खात्याचे उपसंचालक एम. एन. चेतनकुमार यांनी आज दिली.

बेळगावमध्ये आज बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. मुदत संपलेल्या निकृष्ट माध्यान्ह आहार वितरणाचा आरोप फेटाळून लावताना समाज माध्यमांवर नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेऊन तपासणी केली असता बिजगर्णी अंगणवाडीमध्ये मुदत संपलेल्या आहाराचे वितरण करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुलांना आवश्यक असणाऱ्या आहारातील अनेक अन्नपदार्थांसाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टी तीन ते सहा महिने जुन्या असतात असा आरोप ग्रामस्थांनी केल्यामुळे मी स्वतः जातीने तपासणी केली आहे. या तपासणीत मला कोणतीही आक्षेपार्ह बाब दिसून आलेली नाही. संबंधित व्हायरल झालेला व्हिडिओ हा पूर्वीचा जुना आहे. सध्या अंगणवाड्यांमधील माध्यान्ह आहार वितरण स्वच्छता राखून व्यवस्थित सुरू आहे.

 belgaum

ही वस्तुस्थिती असताना तो जुना व्हिडिओ प्रसिद्ध करून गैरसमज, दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संदर्भात चौकशी करून आवश्यक कारवाई केली जाईल असे सांगून बीजगर्णीसह बेळगाव जिल्ह्यातील कोणत्याच अंगणवाडी केंद्रात मुदत संपलेल्या निकृष्ट माध्यान्ह आहाराचे वितरण केले जात नसल्याच्या आपल्या स्पष्टीकरणाचा महिला व बालकल्याण खात्याचे उपसंचालक एम. एन. चेतनकुमार यांनी पुनरुच्चार केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.