बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी पदी (डीडीपीआय) सरकारने पुन्हा ए. बी. पुंडलिक यांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे बेळगावचे गटशिक्षणाधिकारी वाय. जे. बजंत्री यांची खानापूरला बदली करण्यात आली आहे.
बजंत्री यांच्या जागी बेळगावच्या नव्या गटशिक्षणाधिकारी म्हणून विद्या कुंदरगी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
या खेरीज महादेवी आप्पाजी यांची निपाणी, रवींद्र बळीगार यांची बेळगाव डीडीपीआय कचेरीत, भगवंत मेकनमर्डी यांची चिक्कोडी आणि आर. पी. जुटन्नावर यांची कित्तूर शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
बेळगावचे जिल्हा शिक्षण अधिकारी म्हणून नियुक्त झालेले एबी पुंडलिक यांनी या अगोदरही बेळगावचे डीडीपीआय म्हणून काम केले आहे. मागील काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर सायकल वितरण भ्रष्टाचार घोटाळा चा आरोप झाला होता त्यावेळी ते चर्चेत आले होते.
या न्युज देखील वाचा…
‘भ्रष्ट,बेजबाबदार डी डी पी आय पुंडलिकांवर कारवाई करा’-जिल्हा पंचायत