महिलांना राज्य शासनाच्या मोफत बस प्रवासाचा लाभ मिळवून देण्यात बेंगलोरचे बीएमटीसी आणि केकेआरटीसी यांच्या मागोमाग कर्नाटक वायव्य रस्ते परिवहन महामंडळ(एनडब्ल्यूकेएसआरटीसी) राज्यामध्ये तिसरा क्रमांकावर आहे.
राज्यातील काँग्रेस सरकारच्या पाच गॅरंटी योजनांपैकी एक असलेल्या महिलांच्या मोफत बस प्रवास योजनेला गेल्या तीन आठवड्यात व्यापक प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या 1 जूनपासून सुरू झालेल्या या योजने अंतर्गत 25 जूनपर्यंत 7 कोटी 64 लाख 40 हजार 526 महिलांनी मोफत बस प्रवास केला आहे. त्यांच्या 179,28,08,410 रुपये इतका तिकिट दर माफ झाला आहे. कर्नाटक वायव्य रस्ते परिवहन महामंडळांतर्गत 1 कोटी 85 लाख 1 हजार 777 महिलांनी गेल्या 11 ते 25 जून दरम्यान मोफत बस प्रवास केला आहे. त्यांचा तिकीट दर 46 कोटी 81 लाख 67 हजार 279 इतका झाला आहे.
केएसआरटीसी संस्थेतर्फे 2 कोटी 33 लाख 77 हजार 151 महिलांनी मोफत बस प्रवास केला असून त्यांचा तिकीट दर 67 कोटी 16 लाख 31 हजार 915 रुपये झाला आहे. बेंगलोरमधील बीएमटीसी संस्थेतर्फे सर्वाधिक महिलांनी मोफत बस प्रवास केला आहे. गेल्या 25 जून पर्यंत तेथील 2 कोटी 53 लाख 87 हजार 419 महिलांनी बस प्रवास केला आहे.
त्यांचा तिकीट दर 31 कोटी 62 लाख 82 हजार 771 रुपये झाला आहे. सर्वात कमी प्रवास केकेआरटीसीच्या बसेस मधून झाला आहे. या ठिकाणी 1 कोटी 1 लाख 74 हजार 777 महिलांनी मोफत बस प्रवास केला असून त्यांचा तिकीट दर 33 कोटी 67 लाख 26 हजार 445 इतका आहे.