belgaum

सरकारी शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना बूट व पायमोजे खरेदी करून देण्याची सूचना शिक्षण खात्याने केली असल्यामुळे आता लवकरच विद्यार्थी विद्यार्थिनींना बूट व पायमोजे उपलब्ध होणार आहेत.

सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या कांही वर्षांपासून एक जोड बूट व पायमोजे उपलब्ध करून दिले जात आहेत. गेल्या 31 मे पासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर सरकारी शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतला आहे.

त्यानुसार विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार प्रत्येक शाळेला बूट व पायमोजे खरेदी करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. अनुदान मंजूर झाल्यानंतर शाळा सुधारणा कमिटी व मुख्याध्यापकांनी इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी व पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी व दहावी याप्रमाणे गट तयार करून विद्यार्थ्यांसाठी चांगल्या प्रतीचे बूट व पायमोजे खरेदी करणे गरजेचे आहे.

बेळगाव व चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात एकूण 5430 सरकारी शाळा असून त्यामध्ये 6 लाख 70 हजार 700 विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. यापैकी बेळगाव जिल्ह्यात 2390 शाळा असून त्यांची पटसंख्या 2 लाख 14 हजार 800 तर चिक्कोडी जिल्ह्यात 3 हजार 40 शाळा असून त्यांची पटसंख्या 4 लाख 55 हजार 900 इतकी आहे.

शिक्षण खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात प्रत्येक शाळेला अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच अनुदान मंजूर झाल्यानंतर विद्यार्थी विद्यार्थिनींना बूट व पायमोजे उपलब्ध करून देण्यास अधिक विलंब लागू नये अशी सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थी -विद्यार्थिनींना मध्यान आहारा दाखल अंडी व केळी वितरित करण्यासाठी एक महिन्याचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे पालक व शिक्षकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.