Friday, May 24, 2024

/

रोटरी वेणुग्रामतर्फे शनिवारी ‘रोटरी मेगा जॉब फेअर -2023’

 belgaum

रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम -बेळगाव यांच्यातर्फे स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंट लिमिटेड च्या सहकार्याने येत्या शनिवार दि. 17 जून रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 या कालावधीत ‘रोटरी मेगा जॉब फेअर -2023’ या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देऊन बेळगाव शहर आणि आसपासच्या भागातील युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम -बेळगावचे माजी अध्यक्ष डी. बी. पाटील यांनी केले.

हॉटेल मिलनच्या सभागृहामध्ये आज बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावतर्फे या पद्धतीने शहरात पहिल्यांदाच मेगा जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे.

समाजातील होतकरू युवकांना चांगली नोकरी मिळून त्यांचे भविष्य उज्वल व्हावे या उद्देशाने एक सामाजिक कर्तव्य म्हणून आम्ही या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. सदर उपक्रमामध्ये 40 हून अधिक नामवंत कंपन्यांचा सहभाग असणार आहे. ज्यामध्ये स्थानिक कंपन्यांसह पुणे, बेंगलोर वगैरे परगावच्या कंपन्यांचा समावेश असणार आहे. बेळगावच्या स्थानिक तसेच आसपासच्या परिसरातील युवकांना प्राधान्याने नोकरीची संधी मिळावी हा ‘रोटरी मेगा जॉब फेअर -2023’ आयोजनाचा हेतू आहे.

 belgaum

या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना 4 हजारापर्यंत नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत असे डी. बी. पाटील यांनी स्पष्ट केले.

क्लब रोड येथील बी. के. कॉलेज येथे येत्या शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात इयत्ता दहावी, बारावी, पदवी उत्तीर्ण, आयटी, आयआयटी, बीई वगैरे शिक्षण घेतलेल्या युवकांना भाग घेता येईल. पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांसह (फ्रेशर्स) सध्या करत असलेली नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांनाही या मेळाव्यात भाग घेता येईल.Rotary

स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंट लिमिटेडचे एचआर शिवानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा होणार आहे सदर रोटरी मेगा जॉब फेअर -2023 चा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी रजिस्ट्रेशन अर्थात नांव नोंदणी मोफत असून इच्छुकांनी रजिस्ट्रेशनसाठी दिलेल्या क्यूआर कोडवर नोंदणी करावी. आतापर्यंत 1000 युवकांनी नांव नोंदणी केली आहे. अजूनही 2 ते 3 हजार युवक आपले रजिस्ट्रेशन करतील, अशी अपेक्षा आहे असे सांगून शहर परिसरातील युवकांनी आपल्या उज्वल भविष्यासाठी या मेगा जॉब फेअरच्या स्वरूपातील संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेवटी डी. बी. पाटील यांनी केले.

पत्रकार परिषदेस रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम -बेळगावचे विद्यमान अध्यक्ष उमेश रामगुरवाडी, स्पेक्ट्रमचे एचआर शिवानंद पाटील, निखिल यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.