Sunday, December 1, 2024

/

बेळगाव लाईव्ह इम्पॅक्ट; उद्यमबाग रस्ता पुर्ववत करण्यास सुरुवात

 belgaum

उद्यमबाग येथील राघवेंद्र हॉटेल बाजूला बेळगाव -खानापूर मुख्य रस्त्याकडेने जलवाहिनी घातल्यानंतर बुजविलेल्या चरीवरील अडथळा ठरणारा मातीचा ढिगारा हटवून रस्ता पूर्ववत समांतर करण्याचे काम हाती घेण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांसह व्यावसायिक आणि उद्योजकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

उद्यमबाग येथील मुख्य हमरस्त्यावर एल अँड टी कंपनीकडून जलवाहिनी घालल्यानंतर चर व्यवस्थित बुजून रस्ता पूर्ववत व्यवस्थित करण्यात आलेला नव्हता. पिरनवाडी क्रॉसपासून तिसऱ्या रेल्वे गेट जवळील उत्सव हॉटेलपर्यंतच्या या चरीवरील मातीचा ढिगारा तसाच ठेवण्यात आला होता.

त्यामुळे रहदारीसह नागरिकांनाही ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत असल्यामुळे सदर रस्ता त्वरित व्यवस्थित दुरुस्त करण्यासंदर्भातील वृत्त बेळगाव लाईव्हने गेल्या शुक्रवारी प्रसिद्ध केले होते आहे.Road work

त्याची दखल घेत संबंधित खात्याकडून आज सोमवारी जेसीबीद्वारे बुजवण्यात आलेल्या चरी वरील मातीचा ढिगारा हटवून रस्ता पूर्ववत समांतर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

यामुळे परिसरातील नागरिक, व्यावसायिक आणि उद्योजकांमध्ये समाधान व्यक्त होत असून ते बेळगाव लाईव्हला धन्यवाद देत आहेत.

जलवाहिनीची ‘ही’ चर व्यवस्थित बुजवून रस्ता पुर्ववत करा : मागणी

जलवाहिनीची ‘ही’ चर व्यवस्थित बुजवून रस्ता पुर्ववत करा : मागणी

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.