Thursday, October 10, 2024

/

बुडा आयुक्तांविरोधात एफआरआय दाखल करण्याचा आदेश

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव विकास प्राधिकरणांतर्गत झालेल्या भूखंड लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे बेळगाव जिल्हा प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते राजकुमार टोपन्नावर यांनी बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांच्याविरोधात खाजगी तक्रार केली होती. या तक्रारी अन्वये तपास सुरु असून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश मोहन प्रभू यांनी बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

बुडामध्ये भूखंड लिलाव प्रक्रियेत अव्यवहार झाल्याचा आरोप राजकुमार टोपाण्णावर यांनी केला होता. मागील ८ महिन्यांपासून सातत्याने या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र या मागणीला पोलीस विभागाने म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. याप्रकरणी एफआयआर दाखल करणे महत्वाचे होते.

मात्र सातत्याने मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची तक्रार राजकुमार टोपाण्णावर यांनी केली. दरम्यान, बुडाच्या या व्यवहाराच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांनी न्यायालयात दाद मागितली असून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश मोहन प्रभू यांनी याप्रकरणी आदेश दिले आहेत.

Buda topannavar
File pic: Rajiv Topannavar

सदर लिलावाप्रकरणी कोणतीही माहिती जनतेला देण्यात आली नाही. हा व्यवहार बुडा अधिकाऱ्यांनी गोपनीयपणे केला असून योग्य प्रक्रिया पार पाडली नसल्याचा आरोपही टोपन्नावर यांनी केला आहे. मॅन्युअल लिलावाअंतर्गत बेकायदेशीर प्रक्रिया राबवून कायद्यातील तरतुदी आणि नियमांनुसार विहित केलेल्या योग्य प्रक्रियेचे पालन न करता घाईघाईने अपात्र व्यक्तींच्या नावे जागा लिलाव करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी बुडा आयुक्तांनी अपूर्ण माहिती आणि अपूर्ण कागदपत्रे सादर केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

राजकुमार टोपन्नावर यांनी केलेल्या या तक्रारीनुसार बुडा आयुक्तांना या संपूर्ण व्यवहाराच्या तपशिलाचा खुलासा बेळगाव लोकायुक्तांमार्फत डीव्हीआयएसपींकडे करावा, पुढील तपासासाठी अहवाल सादर करावा, असे आदेश अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने बजावले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.