केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने नुकतेच जाहीर केले आहे त्यांच्या स्मार्ट सिटी मिशनची मुदत या वर्षाच्या जून पासून 2024 म्हणजेच एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे. या विस्तारामुळे बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड सह शंभर स्मार्ट शहरे केवळ दिलेल्या कालखंडात पूर्ण होऊ शकत नाहीत म्हणून ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
शहरी विकास मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व शहरांना विकासात्मक दृष्टिकोनातून त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी पुरेपूर वेळ मिळावा, या संधीचा पुरेपूर फायदा मिळावा यासाठीच हा मुदत वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. स्मार्ट सिटी मिशन 2015 मध्ये लॉन्च करण्यात आले होते जानेवारी 2016 ते जून 2018 या काळात स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे 100 शहरांची निवड केली होती या शहरांना त्यांनी प्रस्तावित केलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांच्या निवड तारखेपासून पाच वर्षाचा कालावधी देण्यात आला होता तथापि 2021 या साली मंत्रालयाने सर्व शंभर शहरांसाठी जून 2023 पर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला होता, शहरांना त्यांचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याच्या उद्देशाने व त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात ते यशस्वी झाल्यात याची खात्री करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
बेळगाव शहरातील अनेक स्मार्ट सिटी चे प्रोजेक्ट इथे अपूर्ण आहेत. स्मार्ट सिटी योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून बेळगाव शहराला एकूण 930 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून त्यापैकी 804 कोटी रुपये आधीच खर्च झाले आहेत 103 कामे हाती घेण्यात आली असून त्यापैकी 75 हुन अधिक कमी पूर्ण झालेली आहेत उर्वरित कामे अंतिम मुदतीपूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे, स्मार्ट सिटी योजनेतील कामे बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर सुरू आहेत म्हणजेच 30 जून नंतरही कामे पूर्ण करता येतील मात्र स्मार्ट सिटी योजनेच्या निधीतून ही कामे पूर्ण होतील.
बेळगावच्या स्मार्ट सिटी योजनेमधील मंडळी रोडचे काम अर्धवट स्थितीत पडून आहे या व्यतिरिक्त मंडोळी रोडचे देखील कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आलेले काम अर्धवट स्थितीत आहेत. या व्यतिरिक्त कला मंदिरच्या व्यापारी संकुलाच्या कामाला विलंब होत आहे याशिवाय व्हॅक्सिन डेपो येथील काम चांगले आहे यामुळे एकंदर बेळगाव येथील स्मार्ट सिटी योजनेचा बोजवारा उडाला आहे असे लोकांचे म्हणणे आहे.
अनेक ठिकाणी गटारी करणे खुदाई करणे अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांच्या असुविधेला पारावार राहिला नाही.एकेकाळी टुमदार व गोंडस असणारे बेळगाव शहर स्मार्ट सिटीच्या योजनेमुळे बकाल झाले आहे. अनेक ठिकाणी लाईट पाणी आणि रस्ते याच्या असुविधेने नागरिक त्रस्त झाले आहेत.