बेळगाव सीमेलगत असणाऱ्या महाराष्ट्रातील कोल्हापूर मध्ये सोशल मीडियाच्या स्टेटस वरून झालेल्या तणावाची दखल बेळगाव पोलिसांनी घेतली आहे.
सोशल मीडियावर पसरवणाऱ्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन बेळगाव पोलिसांनी केले आहे. दक्षता म्हणून पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्हॉट्स ॲप फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या समाज माध्यमातून धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण करणारे वादग्रस्त पोस्ट कुणीही शेअर करू नये किंवा फॉरवर्ड करू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे
सोशल मीडियाच्या माध्यमातून तेढ निर्माण करणाऱ्या वर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा देखील इशारा पोलिसांनी दिला आहे.
कोल्हापुरात घडला होता असा प्रकार
काल सोशल मिडियात आक्षेपार्ह संदेश व्हायरल करण्यात आला होता त्या विरोधात आज मोर्चा काढण्यात आला होता मोर्चाला हिंसक वळण लागले होते त्या विरोधात पोलिसांनी लाठीमार केला होता अनेकांची धरपकड करण्यात आली आहे दरम्यान पोलिसांनी या भागातील इंटर नेट सुविधा देखील बंद केली आहे.