Saturday, July 27, 2024

/

पत्नीच्या हत्येचा कट रचणाऱ्या पतीला पोलिसांचा पाहुणचार!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : पत्नीची हत्या करण्यासाठी देशी पिस्तुल विकत घेऊन तिच्या हत्येचा कट रचणारा पती पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. सचिन बाबासाहेब रायमाने असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

गेल्या १५ दिवसांपूर्वी घटस्फोट घेतलेल्या पत्नीचे लग्नबाह्य संबंध असल्याचा संशय व्यक्त करून तिला मारण्याचा कट रचला. यासाठी त्याने सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कुपवडा गावात पिस्तुल विकत घेतली.

सदर आरोपी मीरज रेल्वे स्थानकावर संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मिरज पोलिसांनी हि कारवाई केली आहे. मिरज येथील गांधी चौकात त्याला अटक करण्यात आली आहे.

सचिन रायमाने हा मूळचा बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथील रहिवासी आहे. सचिनची पत्नी हर्षिता हिने चिक्कोडी पोलिसातही आपल्या जीविताला धोका असल्याची तक्रार दाखल केली होती. सचिन रायमाने याला अटक झाल्यानंतर आता सचिनवर मिरजमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.