एकेकाळी बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुखपद समर्थपणे हाताळणारे आणि त्यानंतर राज्यातील विविध वरिष्ठ पदांवर कार्य केलेले आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांची राज्यातील नव्या काँग्रेस सरकारने माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.
हेमंत निंबाळकर उद्या बुधवारी आपल्या नवीन पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.सिनियर आयपीएस अधिकारी निंबाळकर हे उद्यापासूनच मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकारक्षेत्रात येणार्या माहिती व जनसंपर्क खात्याचे आयुक्त म्हणून रूजू होणार आहेत.
सरकार व जनता यांच्यातील दुव्याचे कार्य माहिती व जनसंपर्क कार्यालय करते .जनतेच्या समस्या सरकार पर्यंत पोहचविणे आणि सरकारी योजना व कार्यांची माहिती जनतेपर्यंत पोहचवून सरकारी योजनांची आमंलबजावणी व परिक्षण करण्याचे कार्य माहिती व जनसंपर्क कार्यालय करते.